Sunday, 16 August 2020

Hammer Headed Flatworm (Bipalium)

खूप दिवसांनी आज टेकडीवर जायची संधी मिळाली. आम्हाला हा गांडुळासारखा प्राणी दिसला आज टेकडीवर. 

चार एक इंचांची लांबी असणारा हा जीव अगदी निरुपद्रवी वाटला बघताना. पण जसजशी त्याच्याविषयी माहिती मिळत गेली तशी मी थक्क झाले. निसर्गामध्ये काय काय घडत असतं, ते आपल्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे.

अंधार्‍या दमट ओलसर जागेत रहायला यांना आवडतं. खूप पाऊस झाल्यावर ते कधीकधी बाहेर मातीमध्ये दिसतात. ते निशाचर आहेत, क्वचित सकाळच्या वेळीही दिसतात. गोगलगाय, शेमडी(slug) यांच्यासारख्या चिकट खुणा हेही मागे ठेवतात.

यांचं भक्ष्य म्हणजे गांडुळे, शेमडी यासारखे जीव. आकाराने आपल्याएवढं मोठं गांडूळ सुद्धा ते आरामात धरतात. आपल्या भक्ष्याला विळखा घातल्यावर ते घश्याचा भाग बाहेर काढून भक्ष्यावर पाचक रस टाकतात, त्यामुळे भक्ष्याचे बाहेरच पचन होऊन ते विरघळायला सुरुवात होते. हा रस मग ते गिळतात. 

नर आणि मादीच्या मीलनातून याचे लैंगिक पुनरुत्पादन होऊ शकतंच, पण काही वेळा हे त्यांच्या शेपटीचा भाग कुठेतरी अडकवून स्वतःचं शरीर ताणत राहतात. शेपटीकडचा भाग शेवटी तुटतो, त्यातून नवा जीव तयार होतो. वर्षाला दोन – तीन वेळा ते असं पुनरुत्पादन करू शकतात.     

आशिया खंडाबाहेर या प्राण्याकडे त्रासदायक invasive species म्हणून बघितलं जातं. कारण शेती, कम्पोस्टिंग, बागकामात मदत करणार्‍या गांडुळांचा हा मोठा शत्रू आहे.

पक्षी, सरडे किंवा दुसरे कुठले जीव यांच्या वाटेला जात नाहीत. मग यांची संख्या मर्यादित कशी राहते? तर एक हॅमर हेडेड फ्लॅटवर्म दुसर्‍यालाही असा खाऊन टाकतो!


Tuesday, 11 August 2020

केना

केन्याची (Commelina benghalensis) फुलं टेकडीवर दर पावसाळ्यात दिसतातच, अणि दर पावसाळ्यात त्या फुलांचा न चुकता फोटो काढला जातोच! 

शेतीच्या शाळेत केन्याची पहिल्यांदा जवळून गाठ पडली. कुठल्याही शेतकर्‍याला विचारा ... शेतात केना म्हणजे त्याच्यासाठी मोठं संकट. वेड्यासारखा पसरतो तो. प्रत्येक पेरातून उगवून येतो, बियांमधूनही येतो, आणि मुळांनाही रनर्स असतातच. त्यामुळे शेतातला केना म्हणजे उपटून दूर टाकून नष्ट करण्य़ाची गोष्ट. त्याच्यावरचा इलाज काही सापडला नव्हता. केना फार वाढण्यापूर्वीच शेतातून काढून टाकायचा हेच ऐकायला – वाचायला मिळालं सगळीकडे. 

शेतातल्या केन्याविषयी मागच्या वेळी लिहिलं तेंव्हा समजलं, की केन्याची भजी आणि भाजीपण खातात. यंदा लॉकडाऊनमुळे सोसायटीच्या बागेत बरंच तण माजलंय, त्यात केनाही फोफावलेला सापडला. त्याची भाजी करून बघावी म्हणून थोडी कोवळी पानं घेतली. 


मुगाची डाळ, कांदा घालून केन्याची कोवळी पानं आणि देठ यांची भाजी केली, ती इतकी सुरेख लागली! 


आता वाटतंय, शेतात आपोआप येणारा बहुगुणी केना उपटून टाकून भाजीची लागवड करणं म्हणजे वेडेपणा आहे. धो धो पावसात सगळ्या पालेभाज्या जमीनदोस्त होतात तेंव्हाही हा जमिनीचा दोस्त टिकून राहतो, मस्त पसरतो. त्याच्या मुळांवरच्या गाठींमुळे जमिनीतल्या नत्राचं प्रमाण वाढतं, जमीन सुपीक होते. गुरं केना खातात, केन्याने दूध वाढतं. त्याचे अनेक औषधी उपयोगही सांगितलेले आहेत. प्रमाणाबाहेर केना खाल्ला तर तो सारक आहे. 

एवढे सगळे गुण असणारा केना खाल्ला का जात नाही, विकला का जात नाही? त्याला भाव आला, तर शेतातला केना उपटून लांब कुठेतरी (तणनाशक मारून?) नष्ट करून दुसरं पीक घेण्याऐवजी एक पीक केन्याचं घेणं परवडेल. केना तण राहणार नाही, आणि त्याला संपवण्याची समस्याही उरायची नाही!    

केन्याविषयी अजून थोडी माहिती इथे, इथे आणि इथे सापडेल.

Wednesday, 29 July 2020

उतरण/मधमाशीचा वेल भाग १

 दिनांक- २९/०७/२०२०

मधमाशीचा वेल

आपल्या उतरंडीच्या वेलाला हेच नाव समर्पक आहे :-).  मधमाशीचे अवयव जर मुलांना प्रत्यक्ष दाखवायचे असतील तर जरुर हा मधमाशीचा वेल मुलांना दाखवा.


पण आज फक्त मधमाश्या नाही तर बर्याच गोस्टी दिसल्या. इतके दिवस ह्याची फळे बघायला उत्सुक होते. लॉकडाउन नंतर एक पंधरवाड्याने खाली उतरले, फळे आली आहेत का बघायला. जी अखेरिज नजरेस पडली. कावळीच्या फळांसारखी देठाच्या दोन्ही बाजुला चिकटलेली उतरंडीची फळं! काटेरी वाटली तरी हिचे काटे खुप मऊ लागले हाताला.

माझ्या मुलीला हा वेल दाखवायला मी मुद्दामुनच घेऊन गेले होते, तर तीनेही बर्याच गोष्टी मला दाखवल्या. ज्या दाखवल्या नसत्या तर मलाही दिसल्या नसत्या. लहान मुलांचे निरिक्षण आपल्या पेक्षा नक्कीच चांगलं असते हे मला कळुन चुकलं.

 

उतरंडीच्या देठावरुन अनेक अतिसुक्ष्म अ‍ॅफिड पर्णरस शोषत बसले होते. 



एक छोटासा खादाड सुरवंट त्याचं काम करत होता... स्तानिक वेल असेल तर एका छोट्याश्या वेलावर सुद्धा किती जैवविवीधता आढळते.



  
आता ह्या वेलाचा विस्तार खुपच वाढला आहे. कर्टन म्हणुन जर कुठला वेल लावायचा असेल , तर हा बेस्ट आहे!



मध्य सप्टेबर मध्ये ह्या वेलाची बोंडं फुटुन बाहेर पडलेल्या अनेक म्हातार्‍या उडण्यासाठी तयार आहेत. पुढच्या मोसमात कुठे हा वेल जर रुजुन आला, तर नक्की ओळखुया आणि निसर्गत: एखादं स्तानिक झाड येत असेल, आणि आपल्या सोसायटीच्या बांधकामाला त्याचा काही अपाय नसेल तर नक्कीच येवु देऊया.


काही महिन्यांनी जेव्हा म्हातोबा टेकडीवर गेलो, तेंव्हा म्हातोबा मंदिराच्या अगदी पायथ्याशी एक फ़ुल वार्‍याबरोबर उडुन आले, वर बघितलं तेंव्हा हाच वेल दिसला. साम्राज्यला हा वेलरुपी प्रसाद म्हातोबानेच दिलाय ह्याची खात्री पटली. 



काही महिन्यांपुर्वी टेकडीवरुन आपल्या गार्डन मध्ये उडत आलेल्या त्या एका म्हातारीने रुजण्यासाठी फार छान वेळ (लॉकडाउनची) आणि जागा (आपल्या गार्डनच्या तारांच कुंपण ) साधली होती….

हुश्शार म्हातारी! J





Sunday, 19 July 2020

उतरण/उतरंड

उतरंड:

Common name: Pergularia
मराठी नाव : मेंढा दुधी , उतरण, उतरंड

अधिक महितीसाठी ह्या लिन्क्स :
https://en.wikipedia.org/wiki/Pergularia

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Pergularia.html

म्हातोबा टेकडीवर नाही पण हा फ्लोरा आपल्या सोसायटीच्या बागेत दिसला आहे, हा वेल आपण लावलेला नाही म्हणजे नक्कीच आपल्या टेकडीने ह्याला इथे धाडला असणार म्हणुन हे पान इथे! :-)

 आपल्या सोसायटीच्या बागेत या वेळी लोकडाउन मध्ये भर उन्हाळ्यामध्ये सगळी झाडे पाण्याअभावी निस्तेज दिसत होती पण त्याच दरम्यान तिथे एक छोटासा वेल जल्माला आला. सुदैवाने सोसयटीच्या माळ्याला सुट्टी असल्या कारणामुळे ह्या तणाला :-) उपटले गेले नव्हते.




आश्चर्य म्हणजे येवढ्या दुष्काळात पण हा झपाट्याने वाढला. आणी महिनाभरातच असा फ़ुलांनी बहरला.


एखाद्या लोलकांसारखी ह्याची फिकट पिवळी फुलं कुठ्ल्याही शोभीवंत झाडांच्या फुलांपेक्षा नक्कीच कमी नाहीत. याच्या फ़ुलांचा मंद गोड वास वातावरणात पसरला होता. आणी सर्वत्र छोट्या आणी आकाराने मोठ्या मधमाश्या आकर्षीत होवुन मध पिण्यात गुंग होत्या. आपल्या सोसायटीच्या बागेत मधमाश्यांची येवढी झूंबड मी फक्त आपट्याच्या झाडावर पाहीली आहे. 
 



रोडच्या कडेला वाढणारा म्हणजे जास्त काळजी घ्यायची गरज नसलेला हा वेल आहे. याला काटेरी फळे येतात, मध्य जुलै उजाडला तरीही ह्याची फळे अजुन द्रुष्ढीस पडली नाहीत. पण जेन्हा ही फळे पीकतात, तेव्हा उकलल्यावर हीच्या म्हातार्या बिज प्रसारणाच काम करतात. वेल लावुनही येतो असा काही ठीकाणी उल्लेख आहे.
जरी रस्त्याच्या कडेला येनारे हे तण असले तरी आयुर्वेदामध्ये ह्यापासुन अनेक गुणकारी औषधांचा उल्लेख आहे.


याच्या मराठी नावाचे कारण त्याच्या पाणांची रचना मडक्याच्या उतरंडी प्रमाने असल्यामुळे झाली असावी.  मराठी मध्ये मेंढा दुधी असं पण म्हणतात. कदाचीत त्याच्या पान तोडल्यावर जो दुधट चीक निघतो त्यामुळे हे समर्पक नाव पडले असावे.
पण असो हा आपल्याला भेट म्हुणुन मिळालेला वेल आपण जपुया.



Saturday, 4 July 2020

Butterflies and Insects of Mhatoba Tekdi


The Flora and Fauna of Mhatoba Tekdi is so varied and no matter how many times one visits, the nature always offers new spectacles to its visitors.

From Butterflies to Insects, from Animals to Birds, the offerings of our Tekdi are abundant!






Tuesday, 23 June 2020

Dwarf Jatropha (किर्कुंडी)

मराठी नाव: किर्कुंडी
Family: Euphorbiaceae (Castor family)
Common name: Dwarf Jatropha 
Botanical name: Jatropha nana 

फुलाचा वास:
झाडाच्या अधिक माहितीसाठी: flowersofindia


फोटोत कळ्या दिसत आहेत.


फोटोत कळ्या, फुले, पालवी  दिसत आहे.

फळ एरंड कुळातील व  विषारी असते.

म्हातोबा टेकडी, वेताळ टेकडी वर ही झुडुपे आढळली आहेत. म्हातोबाला जाताना भिंतीपलिकडे आल्यावर, थोडेसे अंतर चालल्यावर डाव्या बाजुला ह्याची बरीच छोटी झुडुपे दिसतील. आपल्या टेकडीवर उन्हाळ्यात जेंव्हा टेकडीवरची इतर झुडपं झोपलेली असतात, तेव्हा हे एक झुडुप मात्र टवटवीत दिसते.

Photos taken on: 14 June 2020



Monday, 22 June 2020

म्हातोबा टेकडीशी हळुहळू घट्ट होत गेलेल नातं

परमहंसनगरमध्ये माझी एक मैत्रीण रहात होती तिच्या घरी जाताना मी टेकडीचा शोध लावला :-) . आपल्या घराजवळ एक टेकडी आहे हे कळल्यावर जो आनंद झाला! मैत्रीण आणिरेच जण रोज टेकडीवर फिरायला जातात असं कळलं, णि दुसर्‍या दिवशीपासुन मीसुद्धा वेळ मिळेल तेंव्हा तिच्यासोबत सकाळी टेकडी, उघड्या मारुती मंदिरापर्यन्त चढण्याचा दिनक्रम सुरु केला. 

परमहंसनगरपासुन थोडासा चढ आहेचढ चढताना तुम्हाला खडकाळ भाग जाणवेल इथे जास्त हिरवळ दिसत नाही. तो चढला कि भिंत नसलेल मारुतीचं मंदीर लागतं. 



भिंतीपलिकडे काय आहे हे मैत्रिणीलाही महित नव्हतं. पण नवर्‍याडून येवढी महिती मिळाली होती कि ह्याच टेकडीवरुन त्याच्या कंपनीत (आरआयला) पायी जाता येतं म्हणे, कसं ते त्यालाही माहित नव्हतं. आणि समोर दिसणारी भिंत आमच्यासाठी डेड एंड होती. मुलीच्या जन्माआधी आणि नंतर असे दोन वर्ष टेकडीवर पाउलही ठेवता आलं नाही. पण लेक दीड-दोन वर्षांची झाल्यावर तिच्या मैत्रिणी आणि आयांसोबत  टेकडीच्या भिंतींचे सीमोलंघ केले. पहिल्याच नजरेत वढी झाडं बघुन मी टेकडीच्या प्रेमात पडले.  तेव्हां जंगल पाहिल्याचा फील आला, णि शनिवार रविवार वेळ मिळेल तसे टेकडीवर जात रहिलो. आणि माझे टेकडी-प्रेम वाढत गेले. 

मंदिराच्या मागच्या बाजूने भिंत न ओलांडता डावीकडे सरळ गेले तर जमिनीवर प्रकाश पडेल असा मोकळा भाग आहे (फ़ॉरेस्टच्या हद्दीत नसल्याने इथे जास्त लागवड केली गेलेली नाही), सरळ गेले असता इथुन न्यू इंडिया शाळा दिसते, शाळेत आपण पायी पण जा शकतो. आम्ही एकदा शाळेत पायी पण गेलो होतो. (कमी वेळात). :-)

मंदिराच्या मागच्या बाजूने उजवीकडुन भिंतीमधुन पलीकडे फ़ॉरेस्टच्या हद्दीत जाण्यासाठी एक अरुंद प्रवेश आहेथून पुढे मार्ग सुखकर आहे, माणसांनी चालून चालू, टॅंकरमुळे पायी जाता येल असा सरळ मोठा रस्ता झाला आहे. जो पुढे दुसर्‍या मरुती मंदिरापर्यंपुढे म्हतोबाआरआयवेताळ टेकडीजवळून चतु:शृंगीपर्यन्त जातो.  आम्ही चतु:शृंगीपर्यन्त आणि आरआय पर्यन्त चालत गेलो आहोत.


म्हातोबा टेकडीपर्यन्त जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक सरळ सरळ जाणारा. या राजमार्गाने गेलो असता, डावीकडे मंदिराजवळ जाण्यासाठी गडाला चढायला जातात तश्या दगडी पायर्‍या आहेत. दुसरा मार्गही अवघड नाही. दुसर्‍या मारुती मंदिरापासून पुढे गेल्यावर डावीकडे हल्लीच बांधलेली कमान आहे, थून वर छोटासा चढ आहे आणि नंतर उजवीकडे जाणारी पायवाट आहे जी पुढे म्हातोबाला जाते.  म्हातोबाला उजवीकडे न जाता डावीकडे गेलो तर हा रस्ता पुढे बावधानला जातो. 

म्हातोबाला पोहोचल्यावर खूप छान देखवा दिसतो.  दक्षिणेकडे तोंड करुन उभे रहिलो कि आपला लाडका सिंहगड, व्ह्यू क्लिअर असेल तर खडकवासल्याचं पाणी सुद्धा चमकताना दिसतं😊, उत्तरेकडे तोंड केलं की पाषाणचा तलाव असं दृश्य दिसू शकतं. इथे बसून थोडा वेळ विश्रान्ती घेतलीइथली थंडगार हवा खाल्ली की सगळा शीण निघून जातो. 


खडकवासल्याचं पाणी 

प्रथमदर्शनी मला टेकडीवर ओळख पटली ती ग्लिरिसिडीया ह्या झाडाची, पाणी नसतानाही येवढं सुंदर गुलाबी रंगाने फ़ुलणारं झाड खरं तर मला खूप आवडलं होतं, पुढे गेल्यावर देशी-विदेशी ह्या झाडांवर होणारा वाद कला, णि पटला. अशीच एकेका झाडाशी ओळख पटत गेली, णि सर्व निसर्गप्रेमी मित्रमैत्रिणींमुळे त्यांच्याबद्दल अजुन माहिती मिळत गेली. आम्हाला जशी इतरांकडुन माहिती मिळत गेली, ती माहिती ऋतुमानानुसार इथे नोंद करुन ठेवण्याचं आम्ही सर्व निसर्गप्रेमींनी रवलं आहे.


ह्या सगळ्या म्हातोबाला जाण्याच्या खाणाखुणा मुद्दामहून सांगत आहे, ज्याचा संबंध कदाचित पुढे इतर पोस्ट्समध्ये इथली जैवविविधता सांगताना होईल.

म्हातोबा टेकडीचा परिसर