Wednesday 29 July 2020

उतरण/मधमाशीचा वेल भाग १

 दिनांक- २९/०७/२०२०

मधमाशीचा वेल

आपल्या उतरंडीच्या वेलाला हेच नाव समर्पक आहे :-).  मधमाशीचे अवयव जर मुलांना प्रत्यक्ष दाखवायचे असतील तर जरुर हा मधमाशीचा वेल मुलांना दाखवा.


पण आज फक्त मधमाश्या नाही तर बर्याच गोस्टी दिसल्या. इतके दिवस ह्याची फळे बघायला उत्सुक होते. लॉकडाउन नंतर एक पंधरवाड्याने खाली उतरले, फळे आली आहेत का बघायला. जी अखेरिज नजरेस पडली. कावळीच्या फळांसारखी देठाच्या दोन्ही बाजुला चिकटलेली उतरंडीची फळं! काटेरी वाटली तरी हिचे काटे खुप मऊ लागले हाताला.

माझ्या मुलीला हा वेल दाखवायला मी मुद्दामुनच घेऊन गेले होते, तर तीनेही बर्याच गोष्टी मला दाखवल्या. ज्या दाखवल्या नसत्या तर मलाही दिसल्या नसत्या. लहान मुलांचे निरिक्षण आपल्या पेक्षा नक्कीच चांगलं असते हे मला कळुन चुकलं.

 

उतरंडीच्या देठावरुन अनेक अतिसुक्ष्म अ‍ॅफिड पर्णरस शोषत बसले होते. 



एक छोटासा खादाड सुरवंट त्याचं काम करत होता... स्तानिक वेल असेल तर एका छोट्याश्या वेलावर सुद्धा किती जैवविवीधता आढळते.



  
आता ह्या वेलाचा विस्तार खुपच वाढला आहे. कर्टन म्हणुन जर कुठला वेल लावायचा असेल , तर हा बेस्ट आहे!



मध्य सप्टेबर मध्ये ह्या वेलाची बोंडं फुटुन बाहेर पडलेल्या अनेक म्हातार्‍या उडण्यासाठी तयार आहेत. पुढच्या मोसमात कुठे हा वेल जर रुजुन आला, तर नक्की ओळखुया आणि निसर्गत: एखादं स्तानिक झाड येत असेल, आणि आपल्या सोसायटीच्या बांधकामाला त्याचा काही अपाय नसेल तर नक्कीच येवु देऊया.


काही महिन्यांनी जेव्हा म्हातोबा टेकडीवर गेलो, तेंव्हा म्हातोबा मंदिराच्या अगदी पायथ्याशी एक फ़ुल वार्‍याबरोबर उडुन आले, वर बघितलं तेंव्हा हाच वेल दिसला. साम्राज्यला हा वेलरुपी प्रसाद म्हातोबानेच दिलाय ह्याची खात्री पटली. 



काही महिन्यांपुर्वी टेकडीवरुन आपल्या गार्डन मध्ये उडत आलेल्या त्या एका म्हातारीने रुजण्यासाठी फार छान वेळ (लॉकडाउनची) आणि जागा (आपल्या गार्डनच्या तारांच कुंपण ) साधली होती….

हुश्शार म्हातारी! J





No comments:

Post a Comment