Wednesday 29 July 2020

उतरण/मधमाशीचा वेल भाग १

 दिनांक- २९/०७/२०२०

मधमाशीचा वेल

आपल्या उतरंडीच्या वेलाला हेच नाव समर्पक आहे :-).  मधमाशीचे अवयव जर मुलांना प्रत्यक्ष दाखवायचे असतील तर जरुर हा मधमाशीचा वेल मुलांना दाखवा.


पण आज फक्त मधमाश्या नाही तर बर्याच गोस्टी दिसल्या. इतके दिवस ह्याची फळे बघायला उत्सुक होते. लॉकडाउन नंतर एक पंधरवाड्याने खाली उतरले, फळे आली आहेत का बघायला. जी अखेरिज नजरेस पडली. कावळीच्या फळांसारखी देठाच्या दोन्ही बाजुला चिकटलेली उतरंडीची फळं! काटेरी वाटली तरी हिचे काटे खुप मऊ लागले हाताला.

माझ्या मुलीला हा वेल दाखवायला मी मुद्दामुनच घेऊन गेले होते, तर तीनेही बर्याच गोष्टी मला दाखवल्या. ज्या दाखवल्या नसत्या तर मलाही दिसल्या नसत्या. लहान मुलांचे निरिक्षण आपल्या पेक्षा नक्कीच चांगलं असते हे मला कळुन चुकलं.

 

उतरंडीच्या देठावरुन अनेक अतिसुक्ष्म अ‍ॅफिड पर्णरस शोषत बसले होते. 



एक छोटासा खादाड सुरवंट त्याचं काम करत होता... स्तानिक वेल असेल तर एका छोट्याश्या वेलावर सुद्धा किती जैवविवीधता आढळते.



  
आता ह्या वेलाचा विस्तार खुपच वाढला आहे. कर्टन म्हणुन जर कुठला वेल लावायचा असेल , तर हा बेस्ट आहे!



मध्य सप्टेबर मध्ये ह्या वेलाची बोंडं फुटुन बाहेर पडलेल्या अनेक म्हातार्‍या उडण्यासाठी तयार आहेत. पुढच्या मोसमात कुठे हा वेल जर रुजुन आला, तर नक्की ओळखुया आणि निसर्गत: एखादं स्तानिक झाड येत असेल, आणि आपल्या सोसायटीच्या बांधकामाला त्याचा काही अपाय नसेल तर नक्कीच येवु देऊया.


काही महिन्यांनी जेव्हा म्हातोबा टेकडीवर गेलो, तेंव्हा म्हातोबा मंदिराच्या अगदी पायथ्याशी एक फ़ुल वार्‍याबरोबर उडुन आले, वर बघितलं तेंव्हा हाच वेल दिसला. साम्राज्यला हा वेलरुपी प्रसाद म्हातोबानेच दिलाय ह्याची खात्री पटली. 



काही महिन्यांपुर्वी टेकडीवरुन आपल्या गार्डन मध्ये उडत आलेल्या त्या एका म्हातारीने रुजण्यासाठी फार छान वेळ (लॉकडाउनची) आणि जागा (आपल्या गार्डनच्या तारांच कुंपण ) साधली होती….

हुश्शार म्हातारी! J





Sunday 19 July 2020

उतरण/उतरंड

उतरंड:

Common name: Pergularia
मराठी नाव : मेंढा दुधी , उतरण, उतरंड

अधिक महितीसाठी ह्या लिन्क्स :
https://en.wikipedia.org/wiki/Pergularia

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Pergularia.html

म्हातोबा टेकडीवर नाही पण हा फ्लोरा आपल्या सोसायटीच्या बागेत दिसला आहे, हा वेल आपण लावलेला नाही म्हणजे नक्कीच आपल्या टेकडीने ह्याला इथे धाडला असणार म्हणुन हे पान इथे! :-)

 आपल्या सोसायटीच्या बागेत या वेळी लोकडाउन मध्ये भर उन्हाळ्यामध्ये सगळी झाडे पाण्याअभावी निस्तेज दिसत होती पण त्याच दरम्यान तिथे एक छोटासा वेल जल्माला आला. सुदैवाने सोसयटीच्या माळ्याला सुट्टी असल्या कारणामुळे ह्या तणाला :-) उपटले गेले नव्हते.




आश्चर्य म्हणजे येवढ्या दुष्काळात पण हा झपाट्याने वाढला. आणी महिनाभरातच असा फ़ुलांनी बहरला.


एखाद्या लोलकांसारखी ह्याची फिकट पिवळी फुलं कुठ्ल्याही शोभीवंत झाडांच्या फुलांपेक्षा नक्कीच कमी नाहीत. याच्या फ़ुलांचा मंद गोड वास वातावरणात पसरला होता. आणी सर्वत्र छोट्या आणी आकाराने मोठ्या मधमाश्या आकर्षीत होवुन मध पिण्यात गुंग होत्या. आपल्या सोसायटीच्या बागेत मधमाश्यांची येवढी झूंबड मी फक्त आपट्याच्या झाडावर पाहीली आहे. 
 



रोडच्या कडेला वाढणारा म्हणजे जास्त काळजी घ्यायची गरज नसलेला हा वेल आहे. याला काटेरी फळे येतात, मध्य जुलै उजाडला तरीही ह्याची फळे अजुन द्रुष्ढीस पडली नाहीत. पण जेन्हा ही फळे पीकतात, तेव्हा उकलल्यावर हीच्या म्हातार्या बिज प्रसारणाच काम करतात. वेल लावुनही येतो असा काही ठीकाणी उल्लेख आहे.
जरी रस्त्याच्या कडेला येनारे हे तण असले तरी आयुर्वेदामध्ये ह्यापासुन अनेक गुणकारी औषधांचा उल्लेख आहे.


याच्या मराठी नावाचे कारण त्याच्या पाणांची रचना मडक्याच्या उतरंडी प्रमाने असल्यामुळे झाली असावी.  मराठी मध्ये मेंढा दुधी असं पण म्हणतात. कदाचीत त्याच्या पान तोडल्यावर जो दुधट चीक निघतो त्यामुळे हे समर्पक नाव पडले असावे.
पण असो हा आपल्याला भेट म्हुणुन मिळालेला वेल आपण जपुया.



Saturday 4 July 2020

Butterflies and Insects of Mhatoba Tekdi


The Flora and Fauna of Mhatoba Tekdi is so varied and no matter how many times one visits, the nature always offers new spectacles to its visitors.

From Butterflies to Insects, from Animals to Birds, the offerings of our Tekdi are abundant!