Wednesday 23 September 2020

चतुर चतुर किती!

 भाद्रपद महिन्यात एके दिवशी टेकडीवर अचानक चतुरांची धाड पाहिली. इतके दिवस गायब असलेले हे चतुर अचानक कसे बरं दिसु लागतात.

आणि मग रोज चतुरांचे भ्र्मण सोसायटीच्या स्विमिन्ग पुल भोवती  दिसु लागले. एके दिवशी रात्री प्र्काशाच्या दिशेने एक चतुर घरात शिरला. आणि पार गोंधळुनच गेला. ह्या गोंधळात खोलीतल्या कोळ्यांच्या जाळ्यात अडकला गेला. आम्ही त्याला काठीच्या मदतीने मोकळं केलं , तसा तो बालकनीतल्या एका झाडावर जाउन बसला. त्याचे पंख धुळीने माखले होते आणि दुखावले होते. 

 आता पर्यंत बघितलेला सर्वात लांब. (wing span aaprox. 9/10cm निळ्या डोळ्याचा चतुर



चतुर आणि त्यांच्या सारखी दिसणारी टाचणी ह्या odonota कुळातील दोन वेगळ्या जाती आहेत. पावसाळ्यात ढगाळ वातावरणानंतर जेंव्हा सुर्यदर्शन घडु लागतं आणि पारा जसजसा चढत जातो, तेंव्हा  बरेच दिवस लपुन बसलेले चतुर आणि टाचण्या अचानक झुंडीने दिसायला लागतात. हवामानातील ह्या बदलाचे ते निर्देशक आहेत. एवढे दिवस पाण्याबाहेर येण्याची ते वाटच बघत असावेत.


ह्या किटकाच्या जीवनक्रमातील प्रामुख्याने दोन अवस्था असतात. चतुर व टाचणीच्या माद्या स्वच्छ पाण्यामध्ये त्यांची अंडी घालतात. अंडी फोडुन बाहेर पडणार्‍या ह्या किटकांच्या अळ्यांना nymph असे म्हणतात. हे nymph पाण्यामध्येच शिकारीचे चांगले धडे गिरवतात. पाण्यात श्वासोच्छवास करण्यासाठी चतुर nymph च्या पोटात अंतर्गत कल्ले असतात. तर oxygen घेण्यासाठी टाचणी nymph च्या शेपटाला पानासारखे दिसणारे तीन कल्ले असतात. ह्या nymph ने शिकारीसाठी वेगवेगळ्या युक्त्या आत्मसाद केल्या आहेत. एखाद्या भक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर पोटातील पाणी ते वेगाने शेपटीकडुन (eject) सोडतात. ज्यामुळे त्यांना एखाद्या मोटरबोटीसारखा वेग मिळतो. त्यांचा खालचा जबडा हा लवचीक व भक्ष्यावर झडप घेण्यासाठी लांबवर जावु शकतो. पाण्यात असताना डासांच्या अळ्या, आणि पाण्यातले आकाराने लहान तर कधी त्यांच्या पेक्षा मोठ्या माश्यांची शिकार पण करतात. चतुर त्यांच्या आयुष्यातील  जास्तीत जास्त वेळ पाण्यात nymph ह्या अवस्ठेत घालवतात. nymph ची पुर्ण वाढ झाली आणि पाण्याबाहेरील तापमान योग्य असेल तेंव्हा हे पाण्याबहेर येतात. बेरंगी nymph ची कात टाकुन, विवीध रंग धारण करुन हे तरुण चतुर उडायला तयार असतात. भारतात चतुरांच्या जवळजवळ ५०० जाती आहेत.


चतुरांचे मोठ्ठे डोळे हे त्यांचे वैशीष्ट आहे. ३०,००० सुक्ष्म संयुक्त डोळ्यांनी त्यांचे दोन डोळे बनलेले आहेत. ह्या डोळ्यांनी त्यांना ३६० अंशातले आजुबाजुचे सर्व काही दिसु शकते. मनुष्याच्या डोळ्यांना जे दिसु शकत नाही असे infra red & ultra violet spectrum चतुरांना दिसु शकतात. इतकेच नाही तर त्यांच्या मेंदुचा सर्वात जास्त म्हणजे ८० % भाग हा द्रुष्टीसाठी कार्यरत असतो. आणि ह्या द्रुष्टीच्या परीणामी किंवा प्रतीक्षीप्त क्रिया (reflexes) अतीजलद असतात. ह्या किटकांना पंखांच्या दोन जोड्या म्हणजे चार पंख असतात. हा प्रतेक पंख हलवण्यासाठी त्या त्या स्वतंत्र स्नायुचा उपयोग होतो. आणि ह्या प्रतेक स्नायुंवर मेदुचे पुर्ण वैयक्तीक निय़ंत्रण असते. परीणामी हवेत उडण्याच्या बर्याच कला किटकांच्या जातीत फ्क्त ह्यांनाच अवगत आहेत. म्हणजे सरळ, उलटे, आडव्या दिशेने डावी किंवा उजवीकडे उडणे. एकाच ठिकाणी बराच वेळ तरंगत रहाणे, अचानक उडण्याची दिशा बदलणे इत्यादी.


हे पाण्यात असताना तरबेज शिकारी असतातच,,पण हवेत उडताना देखील एखादे लक्ष साधले कि हवेत उडता उडताच भक्ष्य पकडतात. जे त्याच्या पाय़ांमधुन सुटु शकत नाही. त्यांच्या शिकारीची सफलता ९७% येवढी आहे. डास, वेगवेगळ्या माश्या असे लहान तर कधी कधी त्यांच्या आकरपेक्षा मोठी फुलपाखरं, पतंग , इतर चतुर ह्यांची पण शिकार करतात. सहसा कुढल्याही स्वच्छ  पाण्याच्या स्रोताजवळच शिकारीसाठी भ्रमण करतात. आपल्या सोसायटीच्या स्विमिंग पुलचे स्वच्छ पाणी आणि डास ही चतुरांच्या शिकारीसाठी योग्य जागा (habitat) आहे. म्हणुन ते ह्या भागात अधिक दिसतात.


चतुर संवाद कसा साधतात????


त्यांना असलेल्या अद्भुत द्रुष्टीतुन चतुर एकमेकांशी संवाद साधु शकतात. प्रतेक जातीच्या चतुराला व टाचणीला एक विशीष्ट रंग आणि रंगाच्या छटा प्राप्त झाल्या आहेत. एकाच जातीचे नर व मादी ह्यांच्या रंगातही खुप फरक आहे आणि हे अद्भुत रंग ओळखण्याची दिव्यद्रुष्टीही त्यांच्या जवळ आहे. स्वतःच्या जातीतला नर जर एखाद्या चतुर नराच्या नजरेस पडला तर ते युद्ध करुन आपल्या क्षेत्राचे रक्षण करतात. 



लाखो वर्षांपुर्वीच्या जीवाश्मांवरुन असे दिसते कि,  आताचे चतुर आणि काही लाखो वर्षांपुर्वीचे चतुर यांच्या शरीराच्या रचनेत फारसा बदल झालेला नाही. हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बदललाय तो फक्त त्यांचा आकार!  निसर्गाच्या नियमाप्रमाणे बरेच जीव लाखो वर्षांपासुन , बदलत्या वातावरणाप्रमाणे, काळाच्या गरजेप्रमाणे उत्क्रांत होत गेले आहेत आणि त्याच्या शरिरात आजुबाजुच्या वातावरणाशी अवलंबन करण्यात अमुलाग्र बदल घडलाय. मग चतुरांच्या शरीररचनेत का बर बदल झाला नाही?

कि त्यांची निर्मीती ह्या सर्व बदलांचा विचार करुनच झाली असावी, म्हणुन हे सर्व जीवांमधले चतुर......................

टेकडीवर आणि साम्राज्यच्या आवारात पाहिलेल्या टाचण्या आणि चतुर:


टाचण्या (Damselfly):









Mating wheel of Damselfly



चतुर (Dragonfly) :














Corallocarpus epigaeus – Redfruit creeper (कडवी नाई)

 जून महिन्यात टेकडीवर एक मस्त वेल दिसला. पानांवरून तोंडल्याचा भाऊबंद वाटत होता. इतका सुंदर पसरलेला वेल, त्यावरची फुलं – पण हे सगळं अशा खड्ड्यामध्ये होतं, की जवळ जाऊन बघणं, फोटो घेणं असं काहीच शक्य नव्हतं. दुरूनच एक फोटो काढून त्यावर समाधान मानणं भाग होतं. (२८ जून)

 


सुदैवाने पुढच्या काही आठवड्यात अगदी असाच वेल म्हातोबाच्या वाटेवर सापडला, पण याची फुलं सगळी झडून गेली होती त्यामुळे ओळख पटणं अवघड होतं. (५ जुलै, १६ ऑगस्ट)




पुढच्या आठवड्यात या वेलावर तोंडल्यापेक्षा छोटी फळं दिसली. (२३ ऑगस्ट) पिकलेल्या फळांचा लालभडक रंग लक्ष वेधून घेत होता. फळ पिकलं तरी टोकाला आणि देठाला हिरवा रंग तसाच होता.






आता या वेलाचं नाव – गाव शोधायला सोपं होतं. याला कडवी नाई म्हणतात. Redfruit creeper हे इंग्रजी, आणि corollocarpus epigaeus हे त्याचं शास्त्रीय नाव. सह्याद्रीमध्ये सापडणारा हा एक बहुवर्षायु वेल आहे. जमिनीखाली याचे कंद असतात. त्या कंदातून दर पावसाळ्यात नवी फूट येते. याच्या कंदाचे अनेक औषधी उपयोग आहेत. ताप उतरण्यासाठी, दाह, संधीवात, अतिसार अशा अनेक आजारांवर हे गुणकारी आहेत.   


अजून माहितीसाठी: https://www.flowersofindia.net/catalog/slides/Redfruit%20Creeper.html

Monday 14 September 2020

 Botanical name: Grewia hirsuta

मराठी नाव: गोवली

 संस्‍कृत: नागबाला


कुळ: फालसा


.अधिक माहितीसाठी: 

https://www.flowersofindia.net/catalog/slides/Kukurbicha.html


https://sites.google.com/site/efloraofindia/species/m---z/m/malvaceae/grewia/grewia-hirsuta


टेकडीवर सगळीकडेच  दिसणारं असं हे झुडपं आहे. शुष्क पानगळीच्या Dry Deciduous Forest) जंगलात आढळणारे, आणि हत्तिंचे आवडते असे हे झुडुप आहे. मराठीत ह्याला गोवली असं नाव आहे. पावसाळ्यात ह्या झाडांना छोटी पांढरी फुलं लागली होती.  झुडुपांमध्ये पपई प्रमाने फुलांमध्ये नर-मादी अशी दोन वेगळी झाडं दिसली, तर काही ठीकाणी जास्वंदाप्रमाने असल्यासारखे दिसले. 







 

आपल्या टेकडीवर फालसा कुळातील सापडलेलं अजुन एक झाड!  आपल्या टेकडीवर फालसा कुळातील बरीच छोटी झुडुपं , धामण सारखी मोठी झाडं आहेत. 

एरंडवने ह्या भागाला कसं एरंडाच्या झाडांमुळे नाव पडलं , तसं म्हातोबा टेकडीला आता फालसा टेकडी नाव पडतयं कि काय असं वाटतय !


सप्टेंबर महिन्यात ह्याला चिनीमिनी बोरांयेवढी फळ लागलेली दिसतात. कच्ची असताना ती हिरवी दिसतात, व यावर खुप अतिसुक्ष्म केस असतात. पिकलेली फळे पक्षी आवडीने खातात, व गोड लागतात. अर्थात जास्त गर नसल्यामुळे ती नशीबाने माणसांच्या आवडीची नाहीत. 





  मे महिन्यात अगदी वाळलेलं फळं

Wednesday 9 September 2020

 


मराठी नाव: बरबाडा, 

Botanical name: Indigofera Glandulosa. 

Common name: Three-Leaf Indigo


मेथीच्या पानांसारखं दिसणारं, पण भरपुर फांद्या असलेलं हे झुडुप आपल्या सोसायटीच्या हिरवळीवर वाढतंय. 

ह्याला गडद गुलाबी ते लालसर रंगाची छोटी फुलं येतात. आणि मग शेंगा लागतात. 

ह्यां बरबाडा (Three-Leaf Indigo) नावाने ओळखल्या जाणार्‍या झुडुपांच्या खुप जाती आहेत. त्यातल्या Indigofera trifoliata  आणि Indigofera Glandulosa.  मध्ये खुपच साधर्म्य आहे. पण ह्याला येणार्‍या शेंगांच्या आकारावरुन त्यांच्या मधला फरक ओळखता येऊ शकतो.




गेल्या वर्षी गणेश चतुर्थीनंतर जीज्ञासा शाळेच्याजवळ असलेल्या टेकडीपायथ्याशी ही झुडुपं बर्यापैकी फुललेली दिसली. कासं पठारावर कसं गवतांच्या आणि विवीध झुडुपांच्या अनेक रंगांची उधळण असते, तसच फुलतो आपल्या टेकडीचा हा पायथा नवरात्रापुर्वी आणि नंतर. आणि त्यांना साथ असते ती असंख्य रंगीत फुलपाखरांची.




आपल्या लॉनचा एखादा भाग स्थानिक झुडुपांनीअसाच भरलेला असावा, तण म्हणुन उपटला जावु नये असं वाटतं. म्हणुनच माळ्याला ह्याची दोन झुडुपं राखायला सांगितली. नाहीतर तण समजुन हा लॉन पेक्षा सुंदर फ्लोरा उपटला जाणार होता. आता ह्या वर्षी आपल्याला सुद्धा घरीच बसुन निदान ह्या एका झुडुपाने तरी कास पठारावरचं नेत्र सुख अनुभवता येईल. 

आपल्या सोसयटीच्या बागेत उगवलेलं हे पहिलं फुलं 😍

Sunday 6 September 2020

म्हातोबा टेकडीवर लांडगा

म्हातोबा टेकडीवर लांडगा आला रे आला!



commonly known as: bristly starbur, goathead, hispid starburr, Texas cockspur 


Botanical name: Acanthospermum hispidum


अधिक माहीती साठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bristly%20Starbur.html


मराठी नाव:  लांडगा






टेकडीच्या पायथ्याशी येताना  सुर्यफ़ुलाच्या कुळातील ही वनस्पती खुप दाटीवाटीने इतर गवतांमध्ये आलेली दिसली. ह्याचं पान , खोड, फ़ुलं असे सगळे भाग केसाळ आहेत. पानाचा वास  छान तुळशीसारखा तजेलदार वाटला. पिवळ्या रंगाची अगदी लहान ३/५ मी.मी. ची फुलं होती. (सुर्यफुलांसारखं वर तोंड करुन नव्हती)  व पानांच्या खालच्या दिशेने होती. फुलं  ९ सप्टेंबर २०२० ला बघितली. 




ह्याला लागणारी फळे(बीया) थोडी अजब दिसणारी आहेत. मराठी नावाप्रमाणे ह्यच्या बीया लांडग्याच्या तोंडासारख्या दिसतात. पण इंग्रजी लोकांना त्या goathead प्रमाने वाटतात. पण ह्याची फळं पण केसाळ असतात. आणि वाळल्यावर ती थोडी काटेरी वाटतात, त्यामुळे लांडगा (foxhead) जास्त योग्य नाव राहील. 😉






Tuesday 1 September 2020

लाजवंती/ झरेरा/ मुक्कुथी

 लाजवंती/ झरेरा/ मुक्कुथी

Common name: Little Tree Plant

Botanical name: Biophytum sensitivum


अधिक माहिती साठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Little%20Tree%20Plant.html


म्हातार्या पावसाचं नक्षत्र संपलं होतं बहुतेक कारण टेकडीवरची अळंबी आता कमी झाली होती. अळंबी शोधताना एक मजेशीर झाड दिसलं. एखाद्या नारळाच्या झाडाचा वामन अवतार असावा तसंच दिसत होतं ते.  जमिनीतुनच फुटुन आलेलं बुटकं नारळाचं झाडं. म्हणुनच ह्याच Common नाव Little Tree Plant पडलं असावं. 


सुंदर पिवळया फुलांचा देठ झाडाच्या मध्यातुनच निघाला होता. 



घरी आल्यावर ह्याचा शोध घेतला तेंव्हा कळलं कि ह्या झाडाला आपल्या लाजाळुच्या झाडासारखं स्पर्शज्ञान आहे. म्हणुन लाजवंती हे नाव. पुढच्या वेळी नक्की हात लावुन बघेन, माझी टेकडीची पुढची भेट हे झाड असेपर्यंत झाली तर.......  

अजुन बरीच माहिती मिळाली ह्या फ़ुलाची. ह्या फ़ुलाला केरळी (कर) मुक्कुथी म्हणतात. आणि मुख्य म्हणजे केरळामध्ये जेव्हा ओनमचा सण साजरा करतात. तेंव्हा ह्या फुलांचा उपयोग पोक्कलम (pookkalam) म्हणजे फुलांच्या रांगोळीमध्ये करतात. आणि हे फुल इथे टेकडीवर मी आज उमललेलं बघतेय आणि उद्या ओनम आहे. भारतीय सणांवर आपला फ्लोरा कित्ती अचुक उमलतो. 😊