Sunday 27 December 2020

जपून टाक पाऊल जरा

ऋतुमानानुसार टेकडीची मालकी बदलत राहते.


वळवाचा पाऊस पडून गेल्यावर , मृग नक्षत्रात टेकडीवर बघायला मिळतात मृगाचे किडे, velvet bugs... ह्यांच राज्य इन मीन दोन आठवड्यांच,




 मग भर पावसात अळंबी, गांडूळ, पैसे बाजी मारतात. त्यांच्या मागून येतात नाकतोडे, पाऊलही ठेवायची भीती वाटते ह्या सगळ्यांना जपताना,जपून प्रत्येक पाऊल टाकावं लागत, असे अगदी पायात येतात, इथे तिथे उद्या मारत असतात 


पाऊस थोडा कमी झाला, पारा चढला की मग सगळीकडे चतुरचं चतुर दिसतात.


आता टेकडीवर थंडी आहे, गवत वाळलं आहे, आणि फॉरेस्ट ने सगळं गवत कापून तो biomass वाटेच्या कडेला mulch म्हणून टाकलाय.ह्यावेळी टेकडी वावरायला मोकळी असं वाटलं, मी मागे एकटीच राहिले म्हणून धावत चालले होते, तितक्यात पायाखालून एक बिचारा सरडा वेगाने वाट cross करत होता, कसाबसा पाय हवेतच धरला. आज काल   ह्या वाळक्या गवतामधून  सापसुरळी, पाली आणि सरड्यांचं  बऱ्याच वेळा दर्शन होतं असतं..   





त्यामुळे टेकडीवर जाताना, स्वतः लाच म्हणावं लागतं, तू जपून टाक पाऊल जरा.

आजकाल टेकडीवर बरेच जण Mountain bikes  मोठ्या हौशीने घेवुन जाताना दिसतात, आपल्या ह्या टेकडीवरील ढवळाढ्वळीमुळे हा जो महत्वाचा fauna आहे. तो तीथल्या तीथेच जमीनित गाढला जात असेल, नाही आहेच, आणि आपल्याला ह्याची जाणीव सुद्धा नाही, किंबहुना त्यांच महत्व वाटत नाही. कारण बर्याच वेळा पायांखाली आल्यामुळे मरुन पडलेले म्रुगाचे किडे, छोटी वारुळं आणि नंदीबैलांची तुटलेली घरं दिसली आहेत, जी त्यांच्या घरातल्या (टेकडीवरच्या) आपल्या हस्तक्षेपामुळेच...........

Friday 18 December 2020

मधमाशीच अफीड पालन

 काल एक गंमत बघितली आपल्या गार्डन मध्ये , नांद्रुक च्या झाडावर मधमाशीच पोळ दाखवलं मला लेकीने, ते मैत्रीनेला दाखवत असताना, एक वेगळीच गोस्ट दिसली आम्हाला. नांद्रुकच्या झाडाला किड लागल्यासारख्या  पानांच्या पुंंगळ्या झाल्या होत्या,  आणि त्या पुंंगळ्यामध्ये मधमाश्याया आत बाहेर करत होत्या.

मनात शंका आली की कामकरी माश्यांनी वेगळं बिर्हाडतर नाहीना बांधलं 😁,,. कशासाठी त्या पुंंगळ्यामध्ये एवढी धडपड...

की आळशी मधमाशीची लपायची जागा आहे ही,.

सगळ्या पुंंगळ्या तपासून पाहिल्यावर हे दिसलं.  Ficus leaf-rolling psyllid (F L R S)झाडाची पानं दुमडून ह्या उवा आत झाडाचा सॅप पीत बसल्या होत्या. काही झाडाची पाने चिकट झाली होती, त्यांच्या honeydews मुळे.   ह्या धारोष्ण honeydews चा आस्वाद फक्त मधमाश्याच नाही तर इतर माश्याही घेत होत्या.

Psyllidae ने शोषुन बाहेर सोडलेले honeydews आहेत का? म्हणजे एक प्रकारचं sterilised, disinfected, purified animal suger आहे का ते मधमाश्यांसाठी? 

आपण कस मधमाशीपालन करतो मधासाठी तसच ह्यांनी पण केलं असेल अफीड पालन.... पण ह्या सहजीवनात मधमाश्यांंमुळे त्यांना इतर किटकांपासून संरक्षण पण मिळत असेल का?

Ant-Aphid हे सहजीवन बऱ्याच वेळा पाहिलं आहे. पण आज मधमाशी आणि झाडांना लागलेल्या उवा (Psyllidae) च नातं प्रथमच पाहिलं.












 Honeydews मूळे चिकट झालेलं पान


पानातला सॅप शोषल्यामुळे झालेलं पारदर्शक पानं












माझा कॅमेरा आत जाऊ शकला असता तर आत काय चाललंय ते टिपता आलं असतं.

मधमाशीच नाही तर गांधीनमाशी सुद्धा अफीडरस 
पीत असेल




कोशातून बाहेर आलेल्या Psyllidae






Friday 4 December 2020

कुमुदिनी

 २९/११/२०२०


आज वेताळ टेकडीच्या खाणीमध्ये गेलो होतो. खाणीत उतरायची ही दुसरीच वेळ, मागच्या वेळी येवढं पाणी नव्हतं. यावर्षी खुप छान पाऊस झालाय ! 

खाणीवर गेल्या गेल्या आकारामुळे पटकन लक्ष गेलं ते एकमेवं आलेल्या water lilly कडे. 

इतर जलवनस्पती न्याहाळताना, पाणलवंग, नालबी तर आतापर्यंत ओळखीच्या झाल्याने पटकन ओळखता आल्या, पण कमळ किंवा लिलीप्रमाने पसरट पान असलेली एक नवीन (माझ्याकरता) जलवनस्पती सुद्धा दिसली. फुलं लांबुन खुप छोटी दिसत होती. 


एका ठिकाणी काठाला लागुन आली होती, त्यामुळे रुप, रंग आणि आकार जवळुन बघता आला. 






सुंदर आणि शुभ्र, बारीकसं एक ते दिड से.मी ची फुलं , आणि बदामासारखं पसरट पान. 




सवयीप्रमाणे नावं शोधलं

 मराठी नाव - कुमुदिनी-

Common name: Crested Floatingheart 

अधिक माहितीसाठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Crested%20Floatingheart.html#:~:text=Nymphoides%20hydrophylla%20%2D%20Crested%20Floatingheart&text=Crested%20Floatingheart%20is%20an%20aquatic,Leaves%20few%20per%20node.





 पानाखाली कंद म्हणजे छोटया केळ्यासारखे (वेलची केळी नाही पण खरोखरच्या वेलची येवढे  ☺ ) घड असतात असं वाचलं. 

 




खाणीत कुमुदिनीचं प्रमाण जास्त असलं तरिही, ही आपल्या कडची स्थानिक जल वनस्पती आहे. त्यामुळे ती water hyacinth सारखी फोफावली/पसरली नाही सगळीकडे.  नाहीतर पाण्यात वाढणार्‍या अस्थानिक जलवनस्पती असतील तर, त्यांच्यामुळे मोठी हानी होते आजुबाजुच्या सगळ्याच परिसरावर हे शिकतोय सध्या Ecology मध्ये.. 


अस्थानिक जल वनस्पती फोफावल्यावर पाण्यातल्या dissolved oxygen च प्रमाण कमी होतं , पुनरुत्पादन खुप वेगात होते, त्यांची चादर पसरली जाते पाण्यावर, त्यामुळे सुर्याचा प्रकाश तळापर्यंत म्हणजे आतल्या इतर जीवसॄष्टीपर्यंत पोहोचु शकत नाही, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो. अंततः ह्या चादरीचा जीवनकाळ संपल्यावर त्याच पाण्यात कुजुल्यांमुळे खुप जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरते.. तिथली स्थानिक जीवस्त्रुष्टी नाश पावते. . . 


आपली हिच कुमुदिनी युरोपात त्रासदायक झालीये. आणि Amazon च्या water hycinth ने नैसर्गीक शत्रुच्या अभावामुळे आपल्या पाण्याला दुषीत केलयं. 


आमच्या म्हतोबा टेकडीवरुन पाषाणचा तलाव छान दिसायचा पुर्वी, पण आता water hycinth वाढल्यामुळे तलाव म्हणजे, खेळाचं ग्राउंड वाटतयं टेकडीवरुन!




Tuesday 1 December 2020

वेताळाची खाण



काल आम्ही खाणीत दुसर्‍यांदा खाली उतरलो.  खाणीत उतरलो खरे पण खुप गर्दी दिसली, आम्हीपण गर्दीचा भाग होतोच खरं.  पण आम्ही फक्त पक्षी आणि पाण्यातली स्रुष्टी न्याहाळायला आलो होतो. आणि आमच्या सोबत होते कॅमेरा घेऊन आलेले, शांतपणे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमी, (कारण हा काळ पक्षी निरीक्षणासाठी चांगला, खाणीत ह्या महीन्यांमध्ये  स्थानिक व स्थलांतरीत असे खुप पक्षी दिसतात.), कुत्र्यांना पाण्यात खेळवण्यासाठी घेऊन आलेले पुणेकर (ह्यांची गर्दी जरा जास्तच होती) , गप्पा मारत बसलेले तरुण आणि तरुणी, पाणी प्यायला आलेल्या गाया आणि बैल आणि पाण्याच्या पलीकडे मोठ्या कष्ठाने कडा उतरण्याचा सराव करत असलेली कॉलेजची शिकलेली मुले,  जी खाली उतरुन दंगा करत होती, आणि पाण्यात भाकर्या काढत होती. अर्थात पाण्यात भाकरी काढणे हा मुलांचा आवडता खेळ. लहानपणी बर्‍याच जणांनी तो खेळलाही असेल. त्यामुळे काहींना ते फार वावग नाही वाटणार, पण खाणीतल्या पक्ष्यांसाठी, तीथल्या wetland  ह्या ecosystem साठी हे कुत्र्यांना पाण्यात खेळवणं, दगडी मारणं हे अपायकारक वाटलं.  आणि काल हेही ऐकण्यात आलं, की लोकं गळ घालून बसतात मासे पकडण्यासाठी...


कास पठारावर कसं कुंपण घातलयं , एक सीमा रेषा आहे , सेक्युरीटी आहे, रेषेच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, तसं करायला हवंय आपल्या खाणीचं असं वाटतं. ज्यामुळे हा भुभाग आपल्या सारख्या महाभागापासुन संरक्षीत राहील.