Tuesday 1 December 2020

वेताळाची खाण



काल आम्ही खाणीत दुसर्‍यांदा खाली उतरलो.  खाणीत उतरलो खरे पण खुप गर्दी दिसली, आम्हीपण गर्दीचा भाग होतोच खरं.  पण आम्ही फक्त पक्षी आणि पाण्यातली स्रुष्टी न्याहाळायला आलो होतो. आणि आमच्या सोबत होते कॅमेरा घेऊन आलेले, शांतपणे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमी, (कारण हा काळ पक्षी निरीक्षणासाठी चांगला, खाणीत ह्या महीन्यांमध्ये  स्थानिक व स्थलांतरीत असे खुप पक्षी दिसतात.), कुत्र्यांना पाण्यात खेळवण्यासाठी घेऊन आलेले पुणेकर (ह्यांची गर्दी जरा जास्तच होती) , गप्पा मारत बसलेले तरुण आणि तरुणी, पाणी प्यायला आलेल्या गाया आणि बैल आणि पाण्याच्या पलीकडे मोठ्या कष्ठाने कडा उतरण्याचा सराव करत असलेली कॉलेजची शिकलेली मुले,  जी खाली उतरुन दंगा करत होती, आणि पाण्यात भाकर्या काढत होती. अर्थात पाण्यात भाकरी काढणे हा मुलांचा आवडता खेळ. लहानपणी बर्‍याच जणांनी तो खेळलाही असेल. त्यामुळे काहींना ते फार वावग नाही वाटणार, पण खाणीतल्या पक्ष्यांसाठी, तीथल्या wetland  ह्या ecosystem साठी हे कुत्र्यांना पाण्यात खेळवणं, दगडी मारणं हे अपायकारक वाटलं.  आणि काल हेही ऐकण्यात आलं, की लोकं गळ घालून बसतात मासे पकडण्यासाठी...


कास पठारावर कसं कुंपण घातलयं , एक सीमा रेषा आहे , सेक्युरीटी आहे, रेषेच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, तसं करायला हवंय आपल्या खाणीचं असं वाटतं. ज्यामुळे हा भुभाग आपल्या सारख्या महाभागापासुन संरक्षीत राहील.  



3 comments:

  1. नीलम तिथे मी एका भागात वेटलँण्ड तयार करायचा प्रयत्न केला होता. पण तू म्हटल्याप्रमाणे तिथे संरक्षण नसल्याने केलेले काम वाया गेले
    स्वातो गोळे

    ReplyDelete
    Replies
    1. स्वाती मॅडम, मला कल्पना होतीच, तुमचे प्रयत्न झालेच असतील खाणीसाठी!
      पुणे शहरातले बाकीचे पाणवठे जलपर्णीने दुषीत झाल्यासारखे वाटतात, पण वेताळाची खाण अजुनही खुप सुंदर आहे.
      पुण्यासारख्या श्रीमंत शहराच्या अश्या एकुलत्या पाणवठ्यासाठी, शहराने एक होऊन तीचं सौंदर्य जपण्यासाठी काहीतरी करायला हवंय,

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete