Sunday 27 December 2020

जपून टाक पाऊल जरा

ऋतुमानानुसार टेकडीची मालकी बदलत राहते.


वळवाचा पाऊस पडून गेल्यावर , मृग नक्षत्रात टेकडीवर बघायला मिळतात मृगाचे किडे, velvet bugs... ह्यांच राज्य इन मीन दोन आठवड्यांच,




 मग भर पावसात अळंबी, गांडूळ, पैसे बाजी मारतात. त्यांच्या मागून येतात नाकतोडे, पाऊलही ठेवायची भीती वाटते ह्या सगळ्यांना जपताना,जपून प्रत्येक पाऊल टाकावं लागत, असे अगदी पायात येतात, इथे तिथे उद्या मारत असतात 


पाऊस थोडा कमी झाला, पारा चढला की मग सगळीकडे चतुरचं चतुर दिसतात.


आता टेकडीवर थंडी आहे, गवत वाळलं आहे, आणि फॉरेस्ट ने सगळं गवत कापून तो biomass वाटेच्या कडेला mulch म्हणून टाकलाय.ह्यावेळी टेकडी वावरायला मोकळी असं वाटलं, मी मागे एकटीच राहिले म्हणून धावत चालले होते, तितक्यात पायाखालून एक बिचारा सरडा वेगाने वाट cross करत होता, कसाबसा पाय हवेतच धरला. आज काल   ह्या वाळक्या गवतामधून  सापसुरळी, पाली आणि सरड्यांचं  बऱ्याच वेळा दर्शन होतं असतं..   





त्यामुळे टेकडीवर जाताना, स्वतः लाच म्हणावं लागतं, तू जपून टाक पाऊल जरा.

आजकाल टेकडीवर बरेच जण Mountain bikes  मोठ्या हौशीने घेवुन जाताना दिसतात, आपल्या ह्या टेकडीवरील ढवळाढ्वळीमुळे हा जो महत्वाचा fauna आहे. तो तीथल्या तीथेच जमीनित गाढला जात असेल, नाही आहेच, आणि आपल्याला ह्याची जाणीव सुद्धा नाही, किंबहुना त्यांच महत्व वाटत नाही. कारण बर्याच वेळा पायांखाली आल्यामुळे मरुन पडलेले म्रुगाचे किडे, छोटी वारुळं आणि नंदीबैलांची तुटलेली घरं दिसली आहेत, जी त्यांच्या घरातल्या (टेकडीवरच्या) आपल्या हस्तक्षेपामुळेच...........

No comments:

Post a Comment