Wednesday 23 September 2020

Corallocarpus epigaeus – Redfruit creeper (कडवी नाई)

 जून महिन्यात टेकडीवर एक मस्त वेल दिसला. पानांवरून तोंडल्याचा भाऊबंद वाटत होता. इतका सुंदर पसरलेला वेल, त्यावरची फुलं – पण हे सगळं अशा खड्ड्यामध्ये होतं, की जवळ जाऊन बघणं, फोटो घेणं असं काहीच शक्य नव्हतं. दुरूनच एक फोटो काढून त्यावर समाधान मानणं भाग होतं. (२८ जून)

 


सुदैवाने पुढच्या काही आठवड्यात अगदी असाच वेल म्हातोबाच्या वाटेवर सापडला, पण याची फुलं सगळी झडून गेली होती त्यामुळे ओळख पटणं अवघड होतं. (५ जुलै, १६ ऑगस्ट)




पुढच्या आठवड्यात या वेलावर तोंडल्यापेक्षा छोटी फळं दिसली. (२३ ऑगस्ट) पिकलेल्या फळांचा लालभडक रंग लक्ष वेधून घेत होता. फळ पिकलं तरी टोकाला आणि देठाला हिरवा रंग तसाच होता.






आता या वेलाचं नाव – गाव शोधायला सोपं होतं. याला कडवी नाई म्हणतात. Redfruit creeper हे इंग्रजी, आणि corollocarpus epigaeus हे त्याचं शास्त्रीय नाव. सह्याद्रीमध्ये सापडणारा हा एक बहुवर्षायु वेल आहे. जमिनीखाली याचे कंद असतात. त्या कंदातून दर पावसाळ्यात नवी फूट येते. याच्या कंदाचे अनेक औषधी उपयोग आहेत. ताप उतरण्यासाठी, दाह, संधीवात, अतिसार अशा अनेक आजारांवर हे गुणकारी आहेत.   


अजून माहितीसाठी: https://www.flowersofindia.net/catalog/slides/Redfruit%20Creeper.html

No comments:

Post a Comment