Wednesday 23 September 2020

चतुर चतुर किती!

 भाद्रपद महिन्यात एके दिवशी टेकडीवर अचानक चतुरांची धाड पाहिली. इतके दिवस गायब असलेले हे चतुर अचानक कसे बरं दिसु लागतात.

आणि मग रोज चतुरांचे भ्र्मण सोसायटीच्या स्विमिन्ग पुल भोवती  दिसु लागले. एके दिवशी रात्री प्र्काशाच्या दिशेने एक चतुर घरात शिरला. आणि पार गोंधळुनच गेला. ह्या गोंधळात खोलीतल्या कोळ्यांच्या जाळ्यात अडकला गेला. आम्ही त्याला काठीच्या मदतीने मोकळं केलं , तसा तो बालकनीतल्या एका झाडावर जाउन बसला. त्याचे पंख धुळीने माखले होते आणि दुखावले होते. 

 आता पर्यंत बघितलेला सर्वात लांब. (wing span aaprox. 9/10cm निळ्या डोळ्याचा चतुर



चतुर आणि त्यांच्या सारखी दिसणारी टाचणी ह्या odonota कुळातील दोन वेगळ्या जाती आहेत. पावसाळ्यात ढगाळ वातावरणानंतर जेंव्हा सुर्यदर्शन घडु लागतं आणि पारा जसजसा चढत जातो, तेंव्हा  बरेच दिवस लपुन बसलेले चतुर आणि टाचण्या अचानक झुंडीने दिसायला लागतात. हवामानातील ह्या बदलाचे ते निर्देशक आहेत. एवढे दिवस पाण्याबाहेर येण्याची ते वाटच बघत असावेत.


ह्या किटकाच्या जीवनक्रमातील प्रामुख्याने दोन अवस्था असतात. चतुर व टाचणीच्या माद्या स्वच्छ पाण्यामध्ये त्यांची अंडी घालतात. अंडी फोडुन बाहेर पडणार्‍या ह्या किटकांच्या अळ्यांना nymph असे म्हणतात. हे nymph पाण्यामध्येच शिकारीचे चांगले धडे गिरवतात. पाण्यात श्वासोच्छवास करण्यासाठी चतुर nymph च्या पोटात अंतर्गत कल्ले असतात. तर oxygen घेण्यासाठी टाचणी nymph च्या शेपटाला पानासारखे दिसणारे तीन कल्ले असतात. ह्या nymph ने शिकारीसाठी वेगवेगळ्या युक्त्या आत्मसाद केल्या आहेत. एखाद्या भक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर पोटातील पाणी ते वेगाने शेपटीकडुन (eject) सोडतात. ज्यामुळे त्यांना एखाद्या मोटरबोटीसारखा वेग मिळतो. त्यांचा खालचा जबडा हा लवचीक व भक्ष्यावर झडप घेण्यासाठी लांबवर जावु शकतो. पाण्यात असताना डासांच्या अळ्या, आणि पाण्यातले आकाराने लहान तर कधी त्यांच्या पेक्षा मोठ्या माश्यांची शिकार पण करतात. चतुर त्यांच्या आयुष्यातील  जास्तीत जास्त वेळ पाण्यात nymph ह्या अवस्ठेत घालवतात. nymph ची पुर्ण वाढ झाली आणि पाण्याबाहेरील तापमान योग्य असेल तेंव्हा हे पाण्याबहेर येतात. बेरंगी nymph ची कात टाकुन, विवीध रंग धारण करुन हे तरुण चतुर उडायला तयार असतात. भारतात चतुरांच्या जवळजवळ ५०० जाती आहेत.


चतुरांचे मोठ्ठे डोळे हे त्यांचे वैशीष्ट आहे. ३०,००० सुक्ष्म संयुक्त डोळ्यांनी त्यांचे दोन डोळे बनलेले आहेत. ह्या डोळ्यांनी त्यांना ३६० अंशातले आजुबाजुचे सर्व काही दिसु शकते. मनुष्याच्या डोळ्यांना जे दिसु शकत नाही असे infra red & ultra violet spectrum चतुरांना दिसु शकतात. इतकेच नाही तर त्यांच्या मेंदुचा सर्वात जास्त म्हणजे ८० % भाग हा द्रुष्टीसाठी कार्यरत असतो. आणि ह्या द्रुष्टीच्या परीणामी किंवा प्रतीक्षीप्त क्रिया (reflexes) अतीजलद असतात. ह्या किटकांना पंखांच्या दोन जोड्या म्हणजे चार पंख असतात. हा प्रतेक पंख हलवण्यासाठी त्या त्या स्वतंत्र स्नायुचा उपयोग होतो. आणि ह्या प्रतेक स्नायुंवर मेदुचे पुर्ण वैयक्तीक निय़ंत्रण असते. परीणामी हवेत उडण्याच्या बर्याच कला किटकांच्या जातीत फ्क्त ह्यांनाच अवगत आहेत. म्हणजे सरळ, उलटे, आडव्या दिशेने डावी किंवा उजवीकडे उडणे. एकाच ठिकाणी बराच वेळ तरंगत रहाणे, अचानक उडण्याची दिशा बदलणे इत्यादी.


हे पाण्यात असताना तरबेज शिकारी असतातच,,पण हवेत उडताना देखील एखादे लक्ष साधले कि हवेत उडता उडताच भक्ष्य पकडतात. जे त्याच्या पाय़ांमधुन सुटु शकत नाही. त्यांच्या शिकारीची सफलता ९७% येवढी आहे. डास, वेगवेगळ्या माश्या असे लहान तर कधी कधी त्यांच्या आकरपेक्षा मोठी फुलपाखरं, पतंग , इतर चतुर ह्यांची पण शिकार करतात. सहसा कुढल्याही स्वच्छ  पाण्याच्या स्रोताजवळच शिकारीसाठी भ्रमण करतात. आपल्या सोसायटीच्या स्विमिंग पुलचे स्वच्छ पाणी आणि डास ही चतुरांच्या शिकारीसाठी योग्य जागा (habitat) आहे. म्हणुन ते ह्या भागात अधिक दिसतात.


चतुर संवाद कसा साधतात????


त्यांना असलेल्या अद्भुत द्रुष्टीतुन चतुर एकमेकांशी संवाद साधु शकतात. प्रतेक जातीच्या चतुराला व टाचणीला एक विशीष्ट रंग आणि रंगाच्या छटा प्राप्त झाल्या आहेत. एकाच जातीचे नर व मादी ह्यांच्या रंगातही खुप फरक आहे आणि हे अद्भुत रंग ओळखण्याची दिव्यद्रुष्टीही त्यांच्या जवळ आहे. स्वतःच्या जातीतला नर जर एखाद्या चतुर नराच्या नजरेस पडला तर ते युद्ध करुन आपल्या क्षेत्राचे रक्षण करतात. 



लाखो वर्षांपुर्वीच्या जीवाश्मांवरुन असे दिसते कि,  आताचे चतुर आणि काही लाखो वर्षांपुर्वीचे चतुर यांच्या शरीराच्या रचनेत फारसा बदल झालेला नाही. हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बदललाय तो फक्त त्यांचा आकार!  निसर्गाच्या नियमाप्रमाणे बरेच जीव लाखो वर्षांपासुन , बदलत्या वातावरणाप्रमाणे, काळाच्या गरजेप्रमाणे उत्क्रांत होत गेले आहेत आणि त्याच्या शरिरात आजुबाजुच्या वातावरणाशी अवलंबन करण्यात अमुलाग्र बदल घडलाय. मग चतुरांच्या शरीररचनेत का बर बदल झाला नाही?

कि त्यांची निर्मीती ह्या सर्व बदलांचा विचार करुनच झाली असावी, म्हणुन हे सर्व जीवांमधले चतुर......................

टेकडीवर आणि साम्राज्यच्या आवारात पाहिलेल्या टाचण्या आणि चतुर:


टाचण्या (Damselfly):









Mating wheel of Damselfly



चतुर (Dragonfly) :














7 comments:

  1. खूपच छान माहिती आणि फोटो! 👍👍👍

    ReplyDelete
  2. Incredible Neelu. Thanks for sharing this.

    ReplyDelete
  3. खूप छान झालाय लेख. मुख्य म्हणजे शास्त्रीय माहिती अगदी सुभग भाषेत लिहिली आहे. ती छान उतरली आहे. तुमच्या सोसायटीमधली टाचण्यांची विविधता खूपच आहे. ते मला विषेश वाटले. स्विमिंग पूल खेरीज अजून कोणते हबिटँटस् आहेत तिथे त्यांना योग्य ?

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. स्वाती मॅडम,

      माफ करा तुमची कमेंट मी आज पाहिली.

      स्विमिंग पूल च्या बाजूला गार्डन आहे, तिथल्या लॉन , बारीक गवतांच्या पातींवर टाचण्या भिरभिरताना दिसतात. आणि स्विमिंग पूल वर जास्त चतुरांचं राज्य असतं. ह्या वर्षी बागेकडे लक्ष न दिल्यामुळे तण खूप वाढलंय त्यामुळे दोघांची मज्जा आहे.

      पाण्याची जागा म्हणाल तर आमच्या सोसायतीत जमिनीखालुन (कॉक्रेटच्या) येणारा एक झरा आहे. पावसाळ्यात रोड च्या खालून आणि water harvesting साठी केलेल्या Gutters मधून तो बाहेर पडतो, हे पाणी आमची सोसायटी पिण्याच्या पाण्याखेरीज इतर कामांसाठी वापरतो. ह्या gutters मध्ये टाचण्या, चतुर आणि water skaters पण दिसतात. पण इथे प्रमाण कमी आहे.

      तसंच आमच्या सोसायटीच्या बाजुला एक बंगला आहे त्यांच्या कडे खुप मोठी आणि जुनी पाण्याची विहीर आहे. बंगल्याबाहेर कमळांसाठी छोटे सिमेंट चे पॉंडस आहेत. सोसायटीच्या आवारात अजुन अश्या दोन विहीरी आहेत. हे सर्व स्वच्छ पाण्याचे अधिवास अजुन तरी आहेत त्यांच्या साठी.

      Delete
  4. my new email address is
    Swati.gole.2020@gmail.com

    ReplyDelete