Wednesday 9 September 2020

 


मराठी नाव: बरबाडा, 

Botanical name: Indigofera Glandulosa. 

Common name: Three-Leaf Indigo


मेथीच्या पानांसारखं दिसणारं, पण भरपुर फांद्या असलेलं हे झुडुप आपल्या सोसायटीच्या हिरवळीवर वाढतंय. 

ह्याला गडद गुलाबी ते लालसर रंगाची छोटी फुलं येतात. आणि मग शेंगा लागतात. 

ह्यां बरबाडा (Three-Leaf Indigo) नावाने ओळखल्या जाणार्‍या झुडुपांच्या खुप जाती आहेत. त्यातल्या Indigofera trifoliata  आणि Indigofera Glandulosa.  मध्ये खुपच साधर्म्य आहे. पण ह्याला येणार्‍या शेंगांच्या आकारावरुन त्यांच्या मधला फरक ओळखता येऊ शकतो.




गेल्या वर्षी गणेश चतुर्थीनंतर जीज्ञासा शाळेच्याजवळ असलेल्या टेकडीपायथ्याशी ही झुडुपं बर्यापैकी फुललेली दिसली. कासं पठारावर कसं गवतांच्या आणि विवीध झुडुपांच्या अनेक रंगांची उधळण असते, तसच फुलतो आपल्या टेकडीचा हा पायथा नवरात्रापुर्वी आणि नंतर. आणि त्यांना साथ असते ती असंख्य रंगीत फुलपाखरांची.




आपल्या लॉनचा एखादा भाग स्थानिक झुडुपांनीअसाच भरलेला असावा, तण म्हणुन उपटला जावु नये असं वाटतं. म्हणुनच माळ्याला ह्याची दोन झुडुपं राखायला सांगितली. नाहीतर तण समजुन हा लॉन पेक्षा सुंदर फ्लोरा उपटला जाणार होता. आता ह्या वर्षी आपल्याला सुद्धा घरीच बसुन निदान ह्या एका झुडुपाने तरी कास पठारावरचं नेत्र सुख अनुभवता येईल. 

आपल्या सोसयटीच्या बागेत उगवलेलं हे पहिलं फुलं 😍

No comments:

Post a Comment