टेकडीवरच्या एका झाडाने बरेच दिवस आम्हाला कोड्यात पाडलं होतं. तीन – चार फूट उंचीच्या या रोपट्याची पानं त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे एकदम नजरेत भरण्यासारखी. पण तरी याची ओळख काही पटत नव्हती. आणि अचानक याचं नाव कळलं ... कुलू / कांडोळ / गम कराया.
पांढरं शुभ्र, गुळागुळीत, रात्री उठून दिसणारं खोड हे या झाडाचं वैशिष्ट्य. या खोडामुळेच याला भुत्या किंवा ‘घोस्ट ट्री’ असंही नाव आहे.
Sterculia urens हे या झाडांचं शास्त्रीय नाव. स्टर्क्युलिया म्हणजे शेण किंवा विष्ठेचा दुर्गंध असणारा. याची फुलं आणि फळं हे नाव सार्थ ठरवतात. डिसेंबर – जानेवारीमध्ये याला फुलं येतात, आणि मार्चपासून हिरवी पोपटी पाच पाकळ्यांच्या मोठ्या फुलासारखी दिसणारी फळं येतात. जून झाल्यावर ही फळं लालसर जांभळी दिसतात. त्यावरचे केस हे खजकुइलीसारखेच खाजरे असतात. शरदिनी डहाणूकरांच्या ‘हिरवाई’ पुस्तकात असा उल्लेखअआहे, की या फळातल्या बिया खाता येतात. (दुर्गंध असणारच, तरीही खातात?)
या झाडाचा डिंक म्हणजे गम कराया. हा पोटाच्या विकारावर औषधी असतो. औषधनिर्मिती उद्योगामध्येही हा डिंक वापरला जातो.
Thursday, 28 January 2021
कांडोळ / कुलू / भुत्या / gum karaya
Wednesday, 20 January 2021
Dioscorea bulbifera डुक्कर कंद /Dioscorea alata उंदियोचा कंद (Indian purple yam)
मराठी नाव: कडु कांद / करणफळ / डुक्कर कंद
Botanical name: Dioscorea bulbifera
Common name: Aerial yam, Air potato, Air yam, Bitter yam
अधिक माहितीसाठी:
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Air%20Yam.html
https://en.wikipedia.org/wiki/Dioscorea_bulbifera
ह्या कंद वर्गात खुप गोंधळ उडतो, कारण Dioscorea ह्या कंद वर्गात बर्याच जाती अहेत. Dioscorea alata आणि Dioscorea.bulbifera ह्यात तर खुप साधर्म्य वाटते.
टेकडीवर जो वेल पावसाळ्यात पाहिला तो हा आहे. पावसाळ्यात ह्याची पाने अजस्त्र झाली होती.
आणि ह्या वेलाला पानांखाली असे लहान कंद/ (air pototoes) लगडलेली दिसली. तसेच ह्या वेलाला जमिनीखाली पण मोठे कंद असतात.
हा bulbifera चा कंद विषारी आहे असे बर्याच ठिकाणी वाचलं. पण विषारी म्हणजे हा कंद आपण कच्चा खाऊ शकत नाही. आपल्या सह्याद्रीच्या घाटात अनेक आदिवासी ह्याची सुंदर भाजी करतात असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये वाचला. आदिवासी जमाती हा कंद वाहत्या झर्यांमध्ये/ पाण्यामध्ये टाकुन ठेवतात, व दुसर्या दिवशी ह्याची छान उकडुन भाजी करतात. त्यामुळे विष म्हणजे आपल्याला पचायला कठिण असलेल्या प्रथिनांवर प्रक्रिया होऊन (detoxification) ती खाण्यायोग्य बनवतात. असे महाराष्ट्रात बरेच शक्तीवर्धक कंद आपले पुर्वज खात होते, ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहचले नाही याचे दुःख वाटते.
आयुर्वेदात कंदाचे कैक उपयोग आहेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे खुप पौष्टिक असल्याने हा बलवर्धक कंद आहे. एकदा खाल्यावर बर्याच वेळ भुक लागत नाही असं बखर रानभाज्यांची ह्या निलीमा जोरवार ह्यांच्या पुस्तकात वाचलं. जुने लोक लांबच्या प्रवासाला जाण्यापुर्वी ह्याच कंदाला उकडुन सोबत घेउन जात असत असे वाचले.
हिवाळ्यात एका वेलावर पाहिलेले हे असे घोस डुक्करकंदाचेच होते का?? ते शोधतेय सध्या. पण नक्कीच Dioscorea च्या कोणत्या तरी जातीचे असावेत.
फळाच्या आकारावरुन ते Dioscorea oppositifolia चे असावेत असा अंदाज वाटतोय.
पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर ह्या वेलाच्या पानांचा आकारामध्ये खुप फरक असतो.
http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Dioscorea+bulbifera
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5306286/
एकदा एखादी गोष्ट माहित पडली कि जळीस्तळी तिच दिसते. तसंच हा दुर्मीळ / फक्त जंगलात दिसणारा वेल आमच्या सोसायटीच्या वाफ्यात ठिकठिकाणी आलेला दिसला. टेकडीसारखी अजस्र पाने नव्हती पण याचे हवेतले छोटे कंद/ बटाटे मात्र लटकलेले दिसले. दोन दिवसांनी तर गार्डन मध्ये याची शेतीच बघितली. हा वेल खुप सावलीच्या ठिकाणी वेड्यासारखा वाढतो व त्याच्या गर्द सावलीमुळे जवळपासच्या झाडांना नीट येवु देत नाही असेहि वाचले.
Dioscorea alata :
हा वेल विज्ञान आश्रम मध्ये आहे.
ह्याला Indian Purple Yam असेही म्हणतात, म्हणजेच ह्या वेलाच्या मुळाला जो मोठा कंद असतो तो उंदियो मध्ये वापरतात. बर्याच वेळा हा cultivated असतो
पाने जराशी वेगळी आहेत, आणि वेलाला लागडलेले कंद पण आकाराने खुप वेगळे आहेत.
ह्याच्या फुलांकडे कधी लक्ष गेलं नाही पण ह्या वर्षी लक्ष ठेवु.
Dr. Almeida ह्यांनी त्यांच्या flowers of maharashtra ह्या पुस्तकात हे दोन वेल वाढताना एक clockwise आणि दुसरा anticlockwise वाढतो असे म्हटले आहे. वेंलामध्ये वर जाताना असा काही दिशादर्शक फ़रक असतो असं माहीत नव्हतं ,पुढच्या वेळी जावु तंव्हा नीट निरखुन पाहिलं पाहिजे.
Monday, 18 January 2021
म्हतोबावरचे पक्षी
पक्षी बघायला त्यांच्याबद्दल जाणुन घ्यायला हल्लीच सुरवात केलीय. त्यांच्याबद्दल जे काही दिसतय ते लिहायचा प्रयत्न इथे करतो आहोत.
१७/०१/२१
Indian Roller निलपंख :
हा पक्षी फारच ओळखीचा झाला आहे आता आमच्या..हल्ली म्हणजे हिवाळा सुरु झालाय तेंव्हापासुन नेहमी दिसतो टेकडीवर, त्याच्या ठराविक जागा आहेत तीथेच. भारतीय असला तरीही कायम नसतो. म्हणुन पाहुणा आहे तो म्हातोबाचा. म्हणुनच कि काय पण नेहमी बिचार्याशी कोणी ना कोणी भांडत असतं. मागच्या रवीवारी खंड्या सोबत भांडण चालु होतं, ते बघताना मजा वाटली, छोटा निलपंख मोठ्या निलपंखामागे लागल्याचा आधी भास झाला. कधी कावळा तर कधी कोतवाल कोणाशीतरी पंगा असतोच ह्याचा, असं का असेल बरं??? आंतर्राज्यातील लोकांमध्ये जसा जागेवरुन कायम वाद असतो तसं प्रकरण वाटतय हे...
Yellow eyed babbler
सहा सात पक्ष्याच्या टोळीने फ़िरणारे हे पक्षी आज साडे ९ च्या सुमाराला म्हातोबा टेकडीवर दिसले.
सातभाई अनेक वेळा पाहिले आहेत, पण ह्यांना पाहुन हे सातभाईचेच भाई आहेत असं कहीच वाटलं नाही, Priniya असावेत का?? पक्षीमित्र धर्मराज ने सांगितलं ह्यांच नाव Yellow eyed babbler. म्हणजे हे पिवळ्या डोळ्यांचे सातभाई :-)..पण ह्याच्या डोळ्यांभोवती पिवळा नाही तर फिकट लालसर नारंगी रंग दिसतोय.
https://ebird.org/species/yeebab1?siteLanguage=en_IN
आणि वरच हे वर्णन वाचुन कळलं सगळ्या पक्ष्यांचे थोडे थोडे गुणधर्म घेतलेत ह्याने.
रोज आकाशात घारी तर पहात असतोच, आज एक अलभ्य लाभ झाला. म्हातोबाच्या मंदिराजवळ पोहोचलो तेंव्हा घारीएवढाच एक शुभ्र पक्षी खुल्या आसमंतात घिरट्या घालत होता. आम्ही पक्ष्याला नीट निरखुन पहाण्यासाठी जसजसं पुढे येत होतो तसतसा तो लांब घिरट्या मारु लागला. आणि आमच्या पासुन दुरवर forest च्या भिंतीच्या आत एका कडुलींबाच्या झाडावर जावुन बसला.
घरी आल्यावर पक्ष्याचं नाव आणि त्यांच्या सवयी जाणुन घेतल्यावर hovering करण्याची त्याची कला कळुन चुकली. तो पक्षी होता कापशी घार, म्हणजेच black winged kite.
https://ebird.org/species/bkskit1?siteLanguage=en_IN
अमीत ने सांगीतलं होतं आपल्या टेकडीवर Eurassian Sparrow hawk दिसतोय सध्या , म्हणुन नेहमी हा पक्षी दिसला की आम्ही ह्यालाच ESH म्हणायचो.
नवर्याच्या मित्राचा कॅमेरा घेतला अभ्यासांकरता.. आता कळला फरक दोघांमधला, हा ESH नसुन kestrel आहे.
दुर्बीण आणि कॅमेरा घेतल्यापासुन खुप पक्षी दिसत आहेत टेकडीवर, जे आज्पर्यंत का दिसले नाहीत :-)
Sunday, 27 December 2020
जपून टाक पाऊल जरा
ऋतुमानानुसार टेकडीची मालकी बदलत राहते.
वळवाचा पाऊस पडून गेल्यावर , मृग नक्षत्रात टेकडीवर बघायला मिळतात मृगाचे किडे, velvet bugs... ह्यांच राज्य इन मीन दोन आठवड्यांच,
मग भर पावसात अळंबी, गांडूळ, पैसे बाजी मारतात. त्यांच्या मागून येतात नाकतोडे, पाऊलही ठेवायची भीती वाटते ह्या सगळ्यांना जपताना,जपून प्रत्येक पाऊल टाकावं लागत, असे अगदी पायात येतात, इथे तिथे उद्या मारत असतात
पाऊस थोडा कमी झाला, पारा चढला की मग सगळीकडे चतुरचं चतुर दिसतात.
आता टेकडीवर थंडी आहे, गवत वाळलं आहे, आणि फॉरेस्ट ने सगळं गवत कापून तो biomass वाटेच्या कडेला mulch म्हणून टाकलाय.ह्यावेळी टेकडी वावरायला मोकळी असं वाटलं, मी मागे एकटीच राहिले म्हणून धावत चालले होते, तितक्यात पायाखालून एक बिचारा सरडा वेगाने वाट cross करत होता, कसाबसा पाय हवेतच धरला. आज काल ह्या वाळक्या गवतामधून सापसुरळी, पाली आणि सरड्यांचं बऱ्याच वेळा दर्शन होतं असतं..
त्यामुळे टेकडीवर जाताना, स्वतः लाच म्हणावं लागतं, तू जपून टाक पाऊल जरा.
आजकाल टेकडीवर बरेच जण Mountain bikes मोठ्या हौशीने घेवुन जाताना दिसतात, आपल्या ह्या टेकडीवरील ढवळाढ्वळीमुळे हा जो महत्वाचा fauna आहे. तो तीथल्या तीथेच जमीनित गाढला जात असेल, नाही आहेच, आणि आपल्याला ह्याची जाणीव सुद्धा नाही, किंबहुना त्यांच महत्व वाटत नाही. कारण बर्याच वेळा पायांखाली आल्यामुळे मरुन पडलेले म्रुगाचे किडे, छोटी वारुळं आणि नंदीबैलांची तुटलेली घरं दिसली आहेत, जी त्यांच्या घरातल्या (टेकडीवरच्या) आपल्या हस्तक्षेपामुळेच...........
Friday, 18 December 2020
मधमाशीच अफीड पालन
काल एक गंमत बघितली आपल्या गार्डन मध्ये , नांद्रुक च्या झाडावर मधमाशीच पोळ दाखवलं मला लेकीने, ते मैत्रीनेला दाखवत असताना, एक वेगळीच गोस्ट दिसली आम्हाला. नांद्रुकच्या झाडाला किड लागल्यासारख्या पानांच्या पुंंगळ्या झाल्या होत्या, आणि त्या पुंंगळ्यामध्ये मधमाश्याया आत बाहेर करत होत्या.
मनात शंका आली की कामकरी माश्यांनी वेगळं बिर्हाडतर नाहीना बांधलं 😁,,. कशासाठी त्या पुंंगळ्यामध्ये एवढी धडपड...
की आळशी मधमाशीची लपायची जागा आहे ही,.
सगळ्या पुंंगळ्या तपासून पाहिल्यावर हे दिसलं. Ficus leaf-rolling psyllid (F L R S)झाडाची पानं दुमडून ह्या उवा आत झाडाचा सॅप पीत बसल्या होत्या. काही झाडाची पाने चिकट झाली होती, त्यांच्या honeydews मुळे. ह्या धारोष्ण honeydews चा आस्वाद फक्त मधमाश्याच नाही तर इतर माश्याही घेत होत्या.
इ
Psyllidae ने शोषुन बाहेर सोडलेले honeydews आहेत का? म्हणजे एक प्रकारचं sterilised, disinfected, purified animal suger आहे का ते मधमाश्यांसाठी?
आपण कस मधमाशीपालन करतो मधासाठी तसच ह्यांनी पण केलं असेल अफीड पालन.... पण ह्या सहजीवनात मधमाश्यांंमुळे त्यांना इतर किटकांपासून संरक्षण पण मिळत असेल का?
Ant-Aphid हे सहजीवन बऱ्याच वेळा पाहिलं आहे. पण आज मधमाशी आणि झाडांना लागलेल्या उवा (Psyllidae) च नातं प्रथमच पाहिलं.
मधमाशीच नाही तर गांधीनमाशी सुद्धा अफीडरस
कोशातून बाहेर आलेल्या Psyllidae
Friday, 4 December 2020
कुमुदिनी
२९/११/२०२०
आज वेताळ टेकडीच्या खाणीमध्ये गेलो होतो. खाणीत उतरायची ही दुसरीच वेळ, मागच्या वेळी येवढं पाणी नव्हतं. यावर्षी खुप छान पाऊस झालाय !
खाणीवर गेल्या गेल्या आकारामुळे पटकन लक्ष गेलं ते एकमेवं आलेल्या water lilly कडे.
इतर जलवनस्पती न्याहाळताना, पाणलवंग, नालबी तर आतापर्यंत ओळखीच्या झाल्याने पटकन ओळखता आल्या, पण कमळ किंवा लिलीप्रमाने पसरट पान असलेली एक नवीन (माझ्याकरता) जलवनस्पती सुद्धा दिसली. फुलं लांबुन खुप छोटी दिसत होती.
एका ठिकाणी काठाला लागुन आली होती, त्यामुळे रुप, रंग आणि आकार जवळुन बघता आला.
सुंदर आणि शुभ्र, बारीकसं एक ते दिड से.मी ची फुलं , आणि बदामासारखं पसरट पान.
सवयीप्रमाणे नावं शोधलं
मराठी नाव - कुमुदिनी-
Common name: Crested Floatingheart
अधिक माहितीसाठी:
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Crested%20Floatingheart.html#:~:text=Nymphoides%20hydrophylla%20%2D%20Crested%20Floatingheart&text=Crested%20Floatingheart%20is%20an%20aquatic,Leaves%20few%20per%20node.
पानाखाली कंद म्हणजे छोटया केळ्यासारखे (वेलची केळी नाही पण खरोखरच्या वेलची येवढे ☺ ) घड असतात असं वाचलं.
खाणीत कुमुदिनीचं प्रमाण जास्त असलं तरिही, ही आपल्या कडची स्थानिक जल वनस्पती आहे. त्यामुळे ती water hyacinth सारखी फोफावली/पसरली नाही सगळीकडे. नाहीतर पाण्यात वाढणार्या अस्थानिक जलवनस्पती असतील तर, त्यांच्यामुळे मोठी हानी होते आजुबाजुच्या सगळ्याच परिसरावर हे शिकतोय सध्या Ecology मध्ये..
अस्थानिक जल वनस्पती फोफावल्यावर पाण्यातल्या dissolved oxygen च प्रमाण कमी होतं , पुनरुत्पादन खुप वेगात होते, त्यांची चादर पसरली जाते पाण्यावर, त्यामुळे सुर्याचा प्रकाश तळापर्यंत म्हणजे आतल्या इतर जीवसॄष्टीपर्यंत पोहोचु शकत नाही, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो. अंततः ह्या चादरीचा जीवनकाळ संपल्यावर त्याच पाण्यात कुजुल्यांमुळे खुप जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरते.. तिथली स्थानिक जीवस्त्रुष्टी नाश पावते. . .
आपली हिच कुमुदिनी युरोपात त्रासदायक झालीये. आणि Amazon च्या water hycinth ने नैसर्गीक शत्रुच्या अभावामुळे आपल्या पाण्याला दुषीत केलयं.
आमच्या म्हतोबा टेकडीवरुन पाषाणचा तलाव छान दिसायचा पुर्वी, पण आता water hycinth वाढल्यामुळे तलाव म्हणजे, खेळाचं ग्राउंड वाटतयं टेकडीवरुन!
Tuesday, 1 December 2020
वेताळाची खाण
काल आम्ही खाणीत दुसर्यांदा खाली उतरलो. खाणीत उतरलो खरे पण खुप गर्दी दिसली, आम्हीपण गर्दीचा भाग होतोच खरं. पण आम्ही फक्त पक्षी आणि पाण्यातली स्रुष्टी न्याहाळायला आलो होतो. आणि आमच्या सोबत होते कॅमेरा घेऊन आलेले, शांतपणे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमी, (कारण हा काळ पक्षी निरीक्षणासाठी चांगला, खाणीत ह्या महीन्यांमध्ये स्थानिक व स्थलांतरीत असे खुप पक्षी दिसतात.), कुत्र्यांना पाण्यात खेळवण्यासाठी घेऊन आलेले पुणेकर (ह्यांची गर्दी जरा जास्तच होती) , गप्पा मारत बसलेले तरुण आणि तरुणी, पाणी प्यायला आलेल्या गाया आणि बैल आणि पाण्याच्या पलीकडे मोठ्या कष्ठाने कडा उतरण्याचा सराव करत असलेली कॉलेजची शिकलेली मुले, जी खाली उतरुन दंगा करत होती, आणि पाण्यात भाकर्या काढत होती. अर्थात पाण्यात भाकरी काढणे हा मुलांचा आवडता खेळ. लहानपणी बर्याच जणांनी तो खेळलाही असेल. त्यामुळे काहींना ते फार वावग नाही वाटणार, पण खाणीतल्या पक्ष्यांसाठी, तीथल्या wetland ह्या ecosystem साठी हे कुत्र्यांना पाण्यात खेळवणं, दगडी मारणं हे अपायकारक वाटलं. आणि काल हेही ऐकण्यात आलं, की लोकं गळ घालून बसतात मासे पकडण्यासाठी...
कास पठारावर कसं कुंपण घातलयं , एक सीमा रेषा आहे , सेक्युरीटी आहे, रेषेच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, तसं करायला हवंय आपल्या खाणीचं असं वाटतं. ज्यामुळे हा भुभाग आपल्या सारख्या महाभागापासुन संरक्षीत राहील.














































