१५/११/२०२०
common name: Indian jointvetch, kat sola,
मराठी : नालबी
Botanical name: Aeschynomene indica
आधिक माहिती साठी:
Seed plant herb.
आपल्या टेकडीवर काहीच भागांमध्ये दाटीवाटीने पसरलेल्या द्विदल वनस्पतीचा हा प्रकार. सप्टेंबर मध्ये म्हणजे पावसाळ्यात आपल्या टेकडीवर आढळला (यंदा पाऊस ऑगस्ट मध्ये सुरु झाला).
शेंगांचा आकार असा सुंदर नक्षीदार आहे .
ह्याच्याबद्दल अधिक माहिती वाचली. हे तृण पाणथळ किंवा पाण्याचा निचरा न होणार्या ठिकाणी आढळते.
बर्याच ठिकाणी ह्याचा वापर मात्र वेगवेगळा केलाय माणसाने!
हिंदी /बंगाली भाषेत ह्याला शोला म्हणतात. ह्या तृणाचे वाळके खोड (भेंड) फोम प्रमाणे असते, त्यामुळे भेंडापासुन वेगवेगळ्या वस्तुंना आकार देऊ शकतो. बंगाली रीति रिवाजात तर नवरदेवाचा मुकुट ह्या शोलाच्या भेंडापासुन बनवतात. शोलाच्या हॅटस व अनेक कलाकुसर असलेल्या वस्तु बनवता येतात.
https://www.wikiwand.com/en/Sholapith#/overview
कोइंबतुर मध्ये मुद्दामहुन ह्याची लागवड केली जाते अस वाचलं, पण कारण स्पष्ट लिहिले नव्हते.
नालबी / शोला हे द्विदल तृण आहे. त्यामुळे इतर द्विदल धान्यांप्रमाणे ह्याच्या मुळांवर तर रायझोबियमच्या गाठी असतात, पण ह्या गाठी ह्याच्या खोडावर सुद्धा दिसतात. ह्या गाठींमधले Bradyrhizobium हे जीवाणु जरा वेगळे आहेत, जे नायट्रोजन स्थिरिकरण करतात, व प्रकाश संश्लेषणही करु शकतात. हिरवळीच्या खतासाठी ह्याचा वापर करतात.
बर्याच ठिकाणी गुरांकरिता ह्याचा चारा म्हणुन उपयोग करतात, पण ह्याच्या बिया विषारी असल्यामुळे काही प्राण्यांना ते अपायकारक आहे, त्यामुळे काही ठिकाणी ह्याचा वापर टाळतात.
पश्चिम महाराष्ट्रात ह्याच्या पानांचा जेवणात उपयोग होतो, स्थानिक भाषेत ह्याला रानपोकळा असेही म्हणतात.
जंगलाचे पाऊस , भुरूपे, पृथ्वीवरील त्याच्या ठिकाणांवरुन अनेक प्रकार बनले आहेत, हे सध्या Ecology मध्ये शिकत आहोत.
एकंदरीत आपली टेकडी ही शुष्क पानझडी जंगलात (Dry Deciduous forest) मोडते, पण तरीही पाणथळी /दलदली जंगलांचे (marshy forest) काही भाग (patches) इथेही आहे असे दिसते.
No comments:
Post a Comment