The Flora and Fauna of Mhatoba Tekdi is so varied and no matter how many times one visits, the nature always offers new spectacles to its visitors.
Saturday, 4 July 2020
Butterflies and Insects of Mhatoba Tekdi
The Flora and Fauna of Mhatoba Tekdi is so varied and no matter how many times one visits, the nature always offers new spectacles to its visitors.
Tuesday, 23 June 2020
Dwarf Jatropha (किर्कुंडी)
मराठी नाव: किर्कुंडी
Family: Euphorbiaceae (Castor family)
Common name: Dwarf Jatropha
Botanical name: Jatropha nana
फुलाचा वास:
झाडाच्या अधिक माहितीसाठी: flowersofindia
फोटोत कळ्या दिसत आहेत.
फोटोत कळ्या, फुले, पालवी दिसत आहे.
फळ एरंड कुळातील व विषारी असते.
म्हातोबा टेकडी, वेताळ टेकडी वर ही झुडुपे आढळली आहेत. म्हातोबाला जाताना भिंतीपलिकडे आल्यावर, थोडेसे अंतर चालल्यावर डाव्या बाजुला ह्याची बरीच छोटी झुडुपे दिसतील. आपल्या टेकडीवर उन्हाळ्यात जेंव्हा टेकडीवरची इतर झुडपं झोपलेली असतात, तेव्हा हे एक झुडुप मात्र टवटवीत दिसते.
Photos taken on: 14 June 2020

Monday, 22 June 2020
म्हातोबा टेकडीशी हळुहळू घट्ट होत गेलेल नातं
परमहंसनगरमध्ये
माझी एक मैत्रीण रहात होती
तिच्या घरी जाताना मी टेकडीचा शोध लावला :-) . आपल्या घराजवळ एक टेकडी आहे हे
कळल्यावर जो आनंद झाला! मैत्रीण आणि बरेच जण रोज टेकडीवर फिरायला जातात असं कळलं, आणि दुसर्या दिवशीपासुन
मीसुद्धा वेळ मिळेल तेंव्हा तिच्यासोबत सकाळी टेकडी, उघड्या मारुती मंदिरापर्यन्त चढण्याचा दिनक्रम सुरु केला.
परमहंसनगरपासुन थोडासा चढ आहे, चढ चढताना तुम्हाला खडकाळ भाग जाणवेल इथे जास्त हिरवळ दिसत नाही. तो चढला कि भिंत नसलेल मारुतीचं मंदीर लागतं.

भिंतीपलिकडे
काय आहे हे मैत्रिणीलाही महित नव्हतं. पण नवर्याकडून येवढी महिती मिळाली होती कि ह्याच टेकडीवरुन त्याच्या कंपनीत (एआरएआयला) पायी जाता येतं म्हणे, कसं ते त्यालाही माहित नव्हतं. आणि समोर दिसणारी भिंत आमच्यासाठी डेड एंड होती. मुलीच्या जन्माआधी आणि नंतर असे दोन वर्ष टेकडीवर पाउलही ठेवता आलं नाही. पण
लेक दीड-दोन
वर्षांची झाल्यावर तिच्या मैत्रिणी आणि आयांसोबत टेकडीच्या भिंतींचे सीमोलंघन केले. पहिल्याच नजरेत एवढी झाडं बघुन मी टेकडीच्या
प्रेमात पडले. तेव्हां जंगल पाहिल्याचा फील आला, आणि शनिवार रविवार
वेळ मिळेल तसे टेकडीवर जात रहिलो. आणि माझे टेकडी-प्रेम वाढत गेले.
मंदिराच्या मागच्या बाजूने भिंत न ओलांडता डावीकडे सरळ
गेले तर जमिनीवर प्रकाश पडेल असा मोकळा भाग आहे (फ़ॉरेस्टच्या हद्दीत नसल्याने इथे जास्त लागवड केली
गेलेली नाही), सरळ गेले असता इथुन न्यू इंडिया शाळा दिसते, शाळेत आपण पायी पण जाऊ शकतो. आम्ही एकदा शाळेत पायी पण गेलो होतो. (कमी वेळात). :-)
मंदिराच्या मागच्या बाजूने उजवीकडुन भिंतीमधुन पलीकडे
फ़ॉरेस्टच्या हद्दीत जाण्यासाठी एक अरुंद प्रवेश आहे, इथून पुढे
मार्ग सुखकर आहे, माणसांनी चालून चालून, टॅंकरमुळे पायी जाता येईल असा सरळ मोठा रस्ता झाला आहे. जो पुढे दुसर्या मरुती मंदिरापर्यंत, पुढे म्हतोबा, एआरएआय, वेताळ टेकडीजवळून चतु:शृंगीपर्यन्त जातो. आम्ही चतु:शृंगीपर्यन्त आणि एआरएआय पर्यन्त चालत गेलो आहोत.
म्हातोबा
टेकडीपर्यन्त जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक सरळ सरळ जाणारा. या राजमार्गाने गेलो असता, डावीकडे मंदिराजवळ जाण्यासाठी गडाला चढायला
जातात तश्या दगडी पायर्या आहेत. दुसरा मार्गही अवघड नाही. दुसर्या मारुती मंदिरापासून पुढे गेल्यावर डावीकडे हल्लीच बांधलेली कमान आहे, इथून वर छोटासा चढ आहे आणि नंतर उजवीकडे जाणारी पायवाट आहे जी पुढे म्हातोबाला जाते. म्हातोबाला उजवीकडे न जाता डावीकडे गेलो तर हा रस्ता
पुढे बावधानला जातो.
म्हातोबाला
पोहोचल्यावर खूप छान देखवा दिसतो. दक्षिणेकडे तोंड करुन उभे रहिलो कि
आपला लाडका सिंहगड, व्ह्यू क्लिअर असेल तर खडकवासल्याचं पाणी सुद्धा चमकताना दिसतं😊, उत्तरेकडे तोंड केलं की पाषाणचा तलाव असं दृश्य दिसू शकतं. इथे
बसून थोडा वेळ विश्रान्ती घेतली, इथली थंडगार हवा खाल्ली की सगळा शीण निघून जातो.
प्रथमदर्शनी
मला टेकडीवर ओळख पटली ती ग्लिरिसिडीया ह्या झाडाची, पाणी नसतानाही येवढं सुंदर गुलाबी रंगाने फ़ुलणारं झाड
खरं तर मला खूप आवडलं होतं, पुढे गेल्यावर देशी-विदेशी ह्या झाडांवर होणारा वाद ऐकला, आणि पटला. अशीच एकेका झाडाशी ओळख पटत गेली, आणि सर्व निसर्गप्रेमी
मित्रमैत्रिणींमुळे त्यांच्याबद्दल अजुन माहिती मिळत गेली. आम्हाला जशी इतरांकडुन
माहिती मिळत गेली, ती माहिती ऋतुमानानुसार इथे नोंद
करुन ठेवण्याचं आम्ही सर्व
निसर्गप्रेमींनी ठरवलं आहे.
ह्या सगळ्या
म्हातोबाला
जाण्याच्या खाणाखुणा मुद्दामहून सांगत आहे, ज्याचा संबंध कदाचित पुढे इतर पोस्ट्समध्ये इथली जैवविविधता सांगताना होईल.
![]() |
म्हातोबा टेकडीचा परिसर
|
काळी मुसळी (Golden Eye Grass - Curculigo orchioides) and other early monsoon plants
14 June 2020
After the heavy rains due to cyclonic storm Nisarga two
weeks back, monsoon has just started, we have had a couple of showers so far. You
can see the colour of Tekdi changing from shades of yellow and brown to a vibrant
green. Amongst the first greens to be seen are the beautiful टाकळा (Sicklepod - Senna obtusifolia)
seedlings. With the first two leaves these look like tiny green butterflies
scattered over black soil.😍 Missed taking a picture of these enchanting saplings
today, but they are in abundance. Surprisingly, we can also see some larger,
about 1 to 2 ft tall, mature plants of टाकळा on Tekdi.
May be these got water when the newly planted bamboo next to it was watered and
hence started early.
Another plant that we see
at the start of monsoon on Tekdi is काळी मुसळी(Golden
Eye Grass - Curculigo orchioides). Somehow the leaves and flowers of this plant don’t
seem to belong together for me. It feels like someone has dropped a plucked
yellow flower next to some exotic palm shoots😂. So, these belong to one plant,
and a native one prized for its medicinal value is a revelation. I guess this plant gets hidden in the grasses later, so never spotted other than after the first few showers.
![]() |
काळी मुसळी(Golden Eye
Grass - Curculigo orchioide
|
One more curiosity at this time of the year is this orchid like plant that I could identify just today - भुईकांदा (South Indian Squill Ledebouria revoluta) The flowers are not that remarkable, but I love the leopard like black spots on these leaves. These seem to sprout from bulbs after the first rains in abundance on the Tekdi.
![]() |
| भुईकांदा (South Indian Squill Ledebouria revoluta |
Friday, 8 September 2017
टेकडी कुणाची?
परवा आमची टेकडी अगदी फोटोसकट पेपरात झळकली. चुकीच्या कारणासाठी – तिथे फिरायला गेलेल्या एका बाईंचा मोबाईल आणि साखळी चोरट्यांनी हिसकावून घेतली म्हणून. त्या तिथे नियमित फिरायला जाणार्यातल्या होत्या. वेळही सोमवारी संध्याकाळी सहा ते सातच्या मधली, म्हणजे शनिवार – रविवार पेक्षा कमी, पण थोडीफार वर्दळीचीच. चोरांचा माग लागला, चोरलेला मालही पोलिसांना परत मिळाला.
चोरांपैकी एक मोठा, बाकी सगळे कायद्याच्या मते अज्ञान. हा मोठा चोर टेकडीजवळच्या झोपडपट्टीत राहणाराच. योगायोगाने माझ्या कामाच्या बाईच्या ओळखीतला. (त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला माझ्या बाईला भेटलाही होता वस्तीत.) साधारण २३ वर्षं वय. आई धुणीभांडी करते, बाप रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. हा घरातला मोठा मुलगा. अजून लहान बहीण आणि भाऊ आहेत, ते शिकताहेत. हा काहीही कामधाम करत नाही. यापूर्वीही त्याने असले उद्योग केलेत, हे माहित वस्तीत सगळ्यांना माहित आहे. चोर्यामार्या करायच्या, पोलीस आलेच तर वस्तीमागच्या टेकडीवरच्या रानातून पसार व्हायचं. टेकडीवर बसून दारू ढोसायची असले याचे उद्योग. याच्याकडे एखादा सुरासुद्धा असायचा कधीमधी. त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जायचं नाही. आपल्या पोरांना असली संगत नको म्हणून त्याला लोक फारसे आपल्या भागात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या बाईंचा नवरा तर संध्याकाळी सहानंतर त्यांच्या मुलग्यांना सुद्धा घराबाहेर पडू देत नाही!
चोरीची तक्रार नोंदवल्याबरोबर लगेच पोलीस वस्तीत आले. पोलिसांना चुकवायला हा दुसरीकडे पळून गेला. तिथेही पोलीस मागावर आलेत म्हटल्यावर उंच इमारतीवरून ड्रेनेजच्या पाईपला धरून उतरण्याच्या प्रयत्नात हा खाली पडला. ससूनला ऍडमिट केलंय, पाठीला जबरदस्त मार लागलाय, बहुतेक दोन्ही पाय लुळे राहणार आता आयुष्यभर. पोलीस – न्यायालय काय शिक्षा देतील तेंव्हा देतील, पण पोराला वाटेल तसा बहकू दिल्याची शिक्षा आईबापांना भोगावी लागणार त्याला आयुष्यभर पोसून.
बाकी सगळं जैसे थे होईल हळुहळू. म्हणजे याचे साथीदार - मित्र कदाचित थोडे दिवस जरा दबून राहतील पोलिसांना. वस्तीतल्या मुलींना जपणारे, त्यांची लवकरात लवकर लग्नं लावून "जबाबदारीतून मोकळे होणारे" आईबाप पुन्हा या पोरांच्या गुंडगिरीकडे काणाडोळा करणार. अर्धवट शिकलेल्या पोरांना बापासारखी मजूरी करायला लाज वाटणार, दुसरं मनासारखं काम क्वचितच सापडणार. नाहीतर ते पुन्हा इकडेच वळणार.
या झोपडपट्टीच्या जवळ मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. तिथे गाड्या धुणं, सिक्युरिटी अशी थोडीफार कामं या वस्तीतली मुलं करतात. बरीच मुलं रिक्षाही चालवतात. इव्हेंट मॅनेजमेंट, भंगारचा धंदा अशी कामंही करतात. पण आईबापाच्या पैशावर गुंडगिरी करणारी मुलंही इथे भरपूर आहेत. वस्तीवर लक्ष ठेवायला पोलिसांनी एक चौकीच केलीय आता जवळ. पण या मुलांशी बोलू शकेल, त्यांना कामाला लावू शकेल असं कुणी मला तरी माहित नाही.
उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा म्हणून टेकडीवर जाणार्या सोसायटीवाल्यांची संख्या रोडावणार, सोसायटीतल्या सोसायटीमध्ये फिरणार्यांची वाढणार. यात सगळ्यांचाच तोटा आहे. कायदा पाळणारे जितके कमी लोक टेकडीवर येतील, तेवढी टेकडी जास्त धोक्याची होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे येत राहिलं पाहिजे. तिथे जाग रहायला हवी किमान सकाळ – संध्याकाळी तरी. फक्त फिरायला येणार्यांनी अवेळी, एकट्यानी गच्च झाडीमध्ये शिरणं, महागडे मोबाईल – दागिने मिरवणं यातून चोराला निमंत्रण दिल्यासारखं होतं याचं भान राखायला हवं. (सोमवारी चोरी झाली त्यांनी यापैकी काही करून मुद्दाम चोरी ओढवून घेतली असं म्हणायचं नाही मला, पण खबरदारी घेणं महत्त्वाचं.) वेगवेगळ्या वर्गातली माणसं जिथे एकत्र येतात अशा सुरक्षित सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये आधीच कमी आहेत. त्या जास्तीत जास्त राखायला हव्यात. सोसायट्यांमध्ये क्लोज सर्किट टिव्ही बसवून आणि महागातल्या सिक्युरिटी एजन्सी नेमून शहर सुरक्षित बनत नाही, फक्त मोजके सुरक्षित घेटो तयार होतात. आणि शहाणे लोक या घेटोच्या आत जितके जास्त राहतील, तेवढं बाहेरचं शहर जास्त असुरक्षित होतं असं मला वाटतं.

Sunday, 6 August 2017
सदिच्छा!
माऊला टेकडीवर जायला खूप आवडतं, पण सकाळी कधी मी तिला टेकडीवर नेत नाही. सुट्टीच्या दिवशी सकाळी टेकडी म्हणजे माझा एकटीचा वेळ असतो. आपल्या गतीने, इकडची तिकडची झाडं बघत टेकडी चढायची, वर फिरायचं आणि घरी परत यायचं म्हणजे माझ्यासाठी एकदम ध्यान केल्यासारखं असतं. सकाळी मोकळ्या हवेत पाय जितके चालतील तितका डोक्यातल्या कचर्याचा निचरा होतो! असं मस्त फिरून परत आल्यावर जे काही वाटतं, त्याला तोड नाही असं माझं मत आहे! अर्थात ही चैन रोज करायला मिळत नाही, फक्त सुट्टीच्या दिवशीच ही संधी मिळते. त्यामुळे हा वेळ कुणाबरोबरही शेयर करायला मी अर्थातच नाखूश असते. अगदी माऊसोबत सुद्धा. माऊला घेऊन मी संध्याकाळी परत एकदा टेकडीवर जाईन, पण सकाळी तिला बरोबर घेणार नाही!
तरीही कुणीतरी वाटेत भेटतं, चार शब्द बोलतं. तितपत तंद्री मोडणं मी चालवून घेते. मागच्या वेळी मात्र गंमत झाली. टेकडीवर नियमित येणारे अगदी रोज, सकाळ – संध्याकाळ येणारेसुद्धा लोक आहेत. त्यातले थोडेफार लोक (माझं आजूबाजूच्या लोकांकडे कधी लक्ष नसतं, तरीही) मला ओळखतात. त्यातले एक आजोबा. खरं तर तरूण आजोबा म्हणायला हवे असे. कारण निवृत्त झालेत, पण उत्साह तरुणासरखा आहे त्यांचा. भलतेच गप्पिष्ट. बरेच वेळा दिसतात, दिसले की दोन शब्द नक्कीच बोलतात. दोन चार वेळा अगदी मला थांबवून सुद्धा गप्पा मारल्यात त्यांनी. खूप कळकळीने बोलतात, त्यांच्या विषयात त्यांना बरंच काही माहित असतं, काही चांगलं व्हावं अशी मनापासून इच्छा असते. तर आज हे आजोबा अगदी चढायला सुरुवात करतानाच भेटले. चालतांना मी फारसं बोलत नाहीच, पण चढताना तर नाहीच नाही. तोंड किंवा पाय एकच काहीतरी चालू शकतं माझं एका वेळी. आजोबांचं स्वगत चालू होतं, मी आपली अगदीच शिष्टपणा वाटू नये इतक्या वेळा एकाक्षरी प्रतिसाद देत होते. टेकडी चढून झाली, पहिल्या बाप्पाचं देऊळ आलं. (टेकडी चढल्याचढल्या हा दिसतो, म्हणून पहिला बाप्पा. माऊने केलेलं बारसं.) अजून पुढे जाऊन खडीसाखरेचा बाप्पा आला (इथे संध्याकाळी प्रसादाला नेहेमी खडीसाखर असते!), पुढे बांबूच्या बेटापाशी पोहोचलो, तिथून तीन वेगवेगळ्या दिशांना रस्ते फुटतात. यांनी पण नेमका माझाच रस्ता निवडला! वाटेतलं मोहाचं झाड आलं आणि गेलं, शेवटी नंदीबैलाच्या बाप्पाला जाऊन पोहोचलो आम्ही. (या बाप्पाच्या समोरच्या जमिनीवर कोळ्यासारख्या दिसणार्या नंदीबैल किड्यांची भरपूर घरं असतात. मातीमध्ये छोटा खड्डा करून तिथे हा मातीखाली लपून बसतो. एखादी मुंगी आली, की तिच्या पायानी खड्याच्या कडेची माती आत पडते, आणि झटकन उडी मारून नंदीबैल सावज धरतो. इथे गेलं, की नंदीबैलाच्या खड्ड्यांमध्ये बारीक काडी घालून त्याला बाहेर काढायचं हा माऊचा आणि सखीचा लाडका खेळ आहे. ) तरी आजोबांचं स्वगत काही संपलं नाही!!! वाटेत नभाळी फुलली होती, फालसा(?)ला फळं धरायला लागली होती, रंगीत सुरवंट दिसले, हिरवं पोपटी गवत उन्हात चमकत होतं, अगदी जवळून मोराचे आवाज आले – मी एक दोन वेळा या सगळ्याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा क्षीण प्रयत्न केला. (पण ते निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यामुळे इतक्या क्षुद्र distractions मुळे चित्त विचलित होऊ न देता ते तासभर बोलत राहू शकतात.) त्यांचं म्हणणं असं, की टेकडीवर आल्यावर दहा – पंधरा मिनिटं लोकांनी एका ठिकाणी गप्पा मारल्या तर किती मज्जा येईल! वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी एकत्र गप्पा मारून डोक्याला किती खुराक मिळेल! उदाहरणार्थ, “भोसडीच्या!” ही तुम्हा आम्हाला शिवी म्हणून माहित आहे. पण हा म्हणे संस्कृतमधल्या “भोs सदिच्छा!” या अभिवादनाचा अपभ्रंश आहे. हे त्यांना टेकडीवर येणार्या एका भाषातज्ञांकडून समजलंय. आजोबा आता टेकडीवर त्यांच्या मित्रांना भेटतांना नेहेमी “भोS सदिच्छा!” म्हणतात!
नंदीबैलाच्या बाप्पाच्या इथे आजोबांना अजून काही स्नेही भेटतात. ते गप्पा मारत थांबतात, मी आल्या वाटेने परत निघते. जातांना ज्या सगळ्यांना धड भेटता न आल्याची चुटपूट लागून राहिली होती, त्या सगळ्या सग्या सोयर्यांना मी परतीच्या वाटेवर निवांत भेटते. तरीही, आजचा चालण्यातला निम्मा वेळ आजोबांनी खाऊन टाकल्याचा सूड मग ब्लॉगवर त्यांचा किस्सा लिहून तरी निघणारच ना! ;)

Sunday, 23 April 2017
पुन्हा एकदा सोन्याच्या फुलांचं झाड
सोनसावर माझी लाडकी. माझा असा समज होता, की या झाडाचा उत्सव असतो जेमतेम दोन – तीन आठवडे, जानेवारी – फेब्रुवारीमध्ये फुलं आल्यावर. एरवी हे झाड विशेष काही बघण्यासारखं नाही. या वर्षी ही फुलं पोटभर बघितली.
त्या सुंदर फुलांच्या मानाने नंतर येणारी वांग्याच्या आकाराची बोंडं अगदीच बेंगळूर वाटायची मला. पण आज पाहिलं तर ती बोंडं झाडावरच उकलली होती, आणि सोनसावरीचा कापूस झाडांखाली पडला होता. आधी एकदम बोअरिंग दिसणारं बोंड उकलल्यावर एवढं मस्त दिसत होतं! उकलतांना त्याच्या बाहेरच्या तपकिरी सालीच्या पाच पाकळ्या आणि आतल्या ऑफ व्हाईट अवरणाच्याही पाच पाकळ्या झाल्या होत्या. इतकी सुंदर रंगसंगती आणि सुबक आकार! खरंच सोन्याच्या फुलांच्या झाडाला साजेसा. एका आड एक तपकिरी आणि ऑफ व्हाईट पाकळी आणि त्यातून डोकावणारा कापूस अशी ही बोंडं झाडावर लटकत होती.
क्वचित कुठेतरी बोंडाच्या पाकळ्या खाली पडलेल्या दिसल्या.
सोनसावरीची बी तशी मोठी, जरा जड आहे आणि कापसाचे तंतू लहान. त्यामुळे या कापसाच्या म्हातार्या वार्यावर उडत नव्हत्या, झाडाखालीच पडल्या होत्या. दोन – चार बिया आणल्यात, बघू रुजवता येतात का या पावसाळ्यात!
Subscribe to:
Posts (Atom)